HW News Marathi
Covid-19

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

मुंबई | दिवसेंदिवस देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अनेक राजकीय नेत्यांकडून कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत असताना देखील राज्यातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये आता शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश झाला आहे. शिंदे यांनी ट्विट करत कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. 

गेल्या काही दिवसापूर्वी राज्यातील जवळपास १० मंत्री, २० पेक्षा अधिक आमदार कोरोनाबाधित झाले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. याआधी आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी हे टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार, खासदार अरविंद सावंत आणि मुंबईतील भाजप नेते अतुल भातखळकर यांनाही करोनाची लागण झाल्याचे काल (३ जानेवारी) स्पष्ट झाले आहे. तर आज एकनाथ शिंदेंना देखील कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदेंचे ट्विट

एकनाथ शिंदे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली माझ्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. आपणां सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन, असे ते म्हणाले. तसेच गेल्या काही दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी, असे आवाहनही एकनाथ शिंदेंनी केले आहे.

https://twitter.com/mieknathshinde/status/1478258211882819585?s=२०


रोहित पवारांनाही कोरोनाची बाधा

सध्या राजकीय नेते आणि मंत्री कोरोनाच्या विळख्यात सापडल्याचे दिसून येत आहे. कालच भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार यांना देखील कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रोहित पवारांनी सोशल मिडियावर याबाबत माहिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ६,७८५ नवे कोरोना रुग्ण आढळले तर २१९ रुग्णांचा झाला मृत्यू

News Desk

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून राज्यातील जनतेला रमजान ईदच्या शुभेच्छा!

News Desk

विद्यार्थ्यांनी चिंता करू नये, येत्या २ दिवसांत चित्र स्पष्ट होईल !

News Desk