HW News Marathi
Covid-19

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली | देशाचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात व्यंकय्या नायडू यांनी ट्विट करत कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. आणि संपर्कात आलेल्या सर्वांनी आठवडाभर स्वत:ला विलगीकरणात ठेवावे, असे त्यांनी म्हटले आहे. संसद भवनातील तब्बल ८७५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर राज्यसभा संचिवालयामध्ये २७१ जणांना कोरोनाची लागण झाली. 

देशात गेल्या दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्येत घट पाहायला मिळाली आहे. देशात आज (२३ जानेवारी) ३ लाख ३३ हजार ५३३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५२५ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर शनिवारी (२२ जानेवारी) ३ लाख ३७ हजार ७०४ रुग्णांना कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या २१ लाख ८७ हजार २०५ ऐवढी आढळून आली आहे. परंतु, देशात रिकव्हरी रेट कमी होऊन ९३.१८ टक्के ऐवढा झाला आहे.

गेल्या काल (२२ जानेवारी) राज्यात कोरोनाच्या ४६ हजार ३९३ नव्या रुग्णांची भर पडली असून ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात काल ३० हजार ७९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात काल ४१६ ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात काल आतापर्यंत २ हजार ७५९ ओमायक्रॉनची नोंद झाली आहे. त्यापैकी १ हजार २२५ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. राज्यात काल ४८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर १.९१ टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत ७० लाख ४० हजार ६१८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याची केंद्राकडे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २० कंपन्यांची मागणी

News Desk

Corona World Update : जगभरात ११ लाखांहून अधिक बरे झाले, तर अमेरिकेत कोरोनाचा सर्वाधिक फटका

News Desk

मोदींना लाल किल्ल्यावरून एखादी मोठी घोषणा करता यावी यासाठी Covaxinचा आटापिटा आहे का?

News Desk