HW News Marathi
Covid-19

मोदींना लाल किल्ल्यावरून एखादी मोठी घोषणा करता यावी यासाठी Covaxinचा आटापिटा आहे का?

मुंबई | सध्या जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाने जनजीवन विस्कळित झाले आहे. लवकरात लवकर कोरोना कसा संपुष्टात येईल यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. तसेच लस तयार करण्याची कामही सुरू आहे आपल्या भारतातही कोरोना विरुद्धची लस तयार केली जात आहे. हैदराबादच्या बायोटेक या कंपनीने COVAXIN नावाची लस तयार केली आहे यासाठी ICMR ने आवश्यक ते तंत्रज्ञान कंपनीला पुरवले आहे.

मात्र भारतातील या कंपनीने आणि आय सी एम आर ने 15 ऑगस्ट पर्यंत ही लस बाजारात आणण्याचा दावा केला. या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील सरकारवर प्रश्न उपस्थित केला होता

कोव्हीड-१९ साठी लस १५ ऑगस्ट पर्यंत तयार होईल हा ICMR चा दावा अवास्तव आहे. लॉकडाऊनचा गोंधळ, कोलमडलेली अर्थव्यवस्था, गलवान खोऱ्यातील नामुष्की या पार्श्वभूमीवर मोदींना लाल किल्ल्यावरून एखादी मोठी घोषणा करता यावी यासाठी हा आटापिटा आहे का? आरोग्य मंत्र्यांनी स्पष्टीकरण केले पाहीजे, असे पृथ्वीराज चव्हाणांनी ट्विट करत प्रश्न उपस्थित केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…मग पंतप्रधानही अयोध्येचा कार्यक्रम दिल्लीतून प्रतिकात्मक का करत नाहीत ?

News Desk

‘सिल्व्हर ओक’नंतर पवारांच्या गोविंद बागेतही ‘कोरोना’चा शिरकाव, चौघांना लागण

News Desk

मंदिर बंद उघडे बार, उद्धवा अजब तुझे सरकार !, राज्य सरकारविरोधात भाजप आक्रमक  

News Desk