HW News Marathi
Covid-19

कोरोनावर मात करुन अखेर नवनीत राणांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

मुंबई | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनावर लागण झाली होती. आज (१७ ऑगस्ट) त्यांना लीलावतीतून डिस्चार्ज देण्यात आला आहे.सुरुवातीला त्यांच्या घरीच उपचार सुरु होते. मात्र, तब्येत खालावल्याने त्यांना नागपूरमध्ये रुग्णालयात दाखल केले होते. तेथे श्वसनाचे त्रास झाल्याने त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात आयसीयुत दाखल केले होते.

६ ऑगस्टला नवनीत राणा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर १३ ऑगस्टला तब्येतीत बिघाड झाल्याने त्यांना नागपूरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्रास आणखी वाढल्याने शेवटी मुंबईला तातडीने त्यांना आणण्यात आले. मुंबईत लीलावती रुग्णालयात आयसीयूतून बाहेर नॉर्मल वॉर्डातून आल्यानंतर आधी त्यांनी लोकांशी व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधला होता. ज्यात त्यांनी मरणाच्या दारातून परत आले अशी म्हटले होते. तसेच, नवनीत राणा यांच्या घरातील १० जणांना कोरोनाची लागण झाली. यांत त्यांच्या २ लहान मुलांचाही समावेश आहे.

https://www.facebook.com/1178465998965117/posts/2112299348915106/

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जंगलचा राजा सिंह कोरोनाच्या जाळ्यात, चेन्नईच्या प्राणिसंग्रहालयात सिंहिणीचा मृत्यू, ९ सिंह पॉझिटिव्ह

News Desk

सातारा जिल्हा रूग्णालयात कोविड चाचणी सेंटर सुरू होणार,अजित पवारांची घोषणा

News Desk

जळगाव जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालये तत्काळ सुरू करावे, आरोग्य मंत्र्यांचे आवाहन

News Desk