HW News Marathi
Covid-19

कुठेही ‘म्युकरमायकोसिस’वर मोफत उपचार नाहीत, सरकारची घोषणा फसवी ! फडणवीसांचा आरोप

मुंबई | राज्य सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. तर संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका देखील वर्तविण्यात आला आहे. अशातच देशासह राज्यासमोर आणखी एक संकट आहे ते म्हणजे म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराचे. राज्यातील विविध भागात म्युकरमायकोसिसमुळे अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. दरम्यान, या आजारावरचे उपचार प्रचंड खर्चिक असल्याने राज्य सरकारकडून महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारची ही घोषणा फसवी असल्याचा गंभीर आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

महाविकास आघाडीची घोषणा फसवी असून राज्यात कुठल्याही रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात नाहीत, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच, कोणत्याही रुग्णालयात दाखल असलेल्या म्युकरमायकोसिसचा रुग्णांना मोफत इंजेक्शन्स देण्यात यावीत, अशी मागणी करत देवेंद्र फडणवीस यांनी “सरकारने जनताभिमुख कामे करावीत”, असा सल्लाही यावेळी दिला आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काहीच दिवसांपूर्वी याबाबत जाहीर घोषणा केली होती. राजेश टोपे म्हणाले होते की, “महात्मा फुले जनआरोग्य योजनेद्वारे म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरील उपचाराचा सर्व खर्च केला जाईल. तसेच औषधाचा खर्चही या योजनेत समाविष्ट केला जाईल.” मात्र, आता फडणवीसांनी केलेल्या आरोपांमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात निर्बंध लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील! – राजेश टोपे

Aprna

महाराष्ट्राला रेमडेसीवीर देण्यास केंद्राची बंदी ! राष्ट्रवादीचा केंद्राला सज्जड इशारा

News Desk

‘दो गज दुरी’ या मंत्राचा वापर करा, पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

News Desk