HW News Marathi
क्राइम

आदिवासी वि. प्र.लिपीक रमेश मुंडकर लाच घेताना रंगे हात अटक

उत्तम बाबळे

नांदेड :- एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प किनवट येथे साहित्य पुरवठ्याचे ८ लाख १२ हजार रुपयाचे देयक काढण्यासाठी मागीतलेली लाच १४ हजार रुपये स्विकारतांना लिपीक रमेश मुंडकर यास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग(ए.सी.बी.) नांदेड च्या पथकाने नांदेड येथील एका लाॅजच्या खोलीत रंगेहात पकडले असून त्या विरुद्ध कारवाई करण्याची प्रक्रीया सुरु आहे. केंद्रवर्ती अर्थसंकल्प २०१६ -१७ योजने अंतर्गत कात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट यास साहित्य पुरवठा करणा-या एका व्यक्तीचे त्या साहित्या पोटीचे थकीत ८ लाख १२ हजार रुपयाचे देयक काढण्यासाठी कार्यालयीन सहाय्यक लिपीकाकडून अडवणूक होत होती.तसेच ते देयक काढण्यासाठी अखेर प्रतिनियुक्तीवर असलेल्या सहाय्यक लिपीक रमेश धोंडीबा मुंडकर , शिक्षक – शासकिय आश्रम शाळा ,उमरी ता.किनवट , रा.शनिवार पेठ,गोकुंदा ता.किनवट याने १५ हजार रुपयाची लाच मागीतली.तडजोडीअंती १४ हजार रुपये देण्याचे ठरले.यानंतर त्या व्यक्तीने ८ जून २०१७ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ,नांदेड येथे याबाबद तक्रार दिली.९ जून रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने किनवट येथे जाऊन पंचासमक्ष खातरजमा केली. तसेच १० जून २०१७ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड चे पोलीस अधीक्षक संजय लाठकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.अधीक्षक संजय कुलकर्णी,पो.नि.जी.एम.सोंडारे,बी.एल.पेडगावकर,पो.ना.दत्तात्रय वडजे,साजीद अली,पो.काॅ.अंकुश गाडेकर,दिपक पवार,ताहेर फहादखाॅन,चालक पो.ना.शिवहार किडे,नरेंद्र बोडखे यांनी साफळा रचला व सहाय्यक लिपीक रमेश मुंडकर यास नांदेड रेल्वे स्थानका जवळील हाॅटेल न्यू राॅयल पंजाब लाॅज च्या खोली क्र.३०३ मध्ये तक्रारदाराकडून १४ हजार रुपयाची लाच स्विकारतांना रंगेहात पकडले.या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात कलम ७,१२,१३ (१)(ड) व १३(२) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ नूसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.पुढील तपास पो.उप अधीक्षक संजय कुलकर्णी हे करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अपघातातील सहा दुर्दैवी मयतांचे एकाच चितेवर सामुहिक अंत्यसंस्कार

News Desk

दिल्लीत ४० कोटीचे हिरोइन जप्त, पोलिसांनी २ आरोपींना अटक

News Desk

राजस्थानमध्ये मंडप कोसळून १४ जणांचा मृत्यू, ४५ जण जखमी

News Desk