HW News Marathi
क्राइम

आलिया भटला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाला अटक

मुंबई बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट यांना अनोळखी फोनवरून आलिया भटला जिवे मारण्याची धमकीचा फोन आला होता. याप्रकरणी महेश भट यांनी जुहु पोलिस ठाण्यात तक्रार नोदवली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन संदीप साहू या इसमाला उत्तरप्रदेशमधील लखनौमधून अटक केली आहे.

संदीप साहूने फोनवरून ५० लाख रुपयांची मागणी केली होती. जर, हे पैसे दिले नाही तर मुलगी आलिया भट आणि पत्नी सोनी राजदान यांना मारण्याची धमकी दिल्याची तक्रार महेश भट यांनी दिली होती.

आरोपीनं सुरुवातीला महेश भट्ट यांना फोन केला होता. पण त्याच्या या धमकीकडे महेश भट्ट यांनी फारसं लक्ष दिलं नव्हतं. पण त्यानंतर धमकीचे अनेक मेसेज महेश भट्ट यांना पाठवण्यात आले. त्यानंतर मात्र, महेश भट्ट यांनी पोलिसात धाव घेतली

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

५४ वर्षे भारतात राहिलेल्या चीनी गुप्तहेराचा मृत्यू

News Desk

“आताच्या पक्षप्रमुखांची शप्पथ घेतली असती, तर परबांवर अजुन विश्वास बसला असता”- नितेश राणे

News Desk

दादरमधील हत्येचे रहस्य उघडकीस

swarit