HW News Marathi
क्राइम

खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी उपचारा दरम्यान रुग्णालयातून पळाला

उत्तम बाबळे

नांदेड :- पत्नीचा खून केल्याच्या गुन्ह्यातील एका ३५ वर्षीय आरोपीस कारागृहातून उपचारासाठी नांदेड येथील शासकिय रुग्णालयात आणले असता त्याने रुग्णालय कर्मचारी व त्यास आणलेल्या पोलीसांना गुंगारा देऊन उपचारा दरम्यान रुग्णालयातून पलायन केले असून त्यास शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांसह जिल्ह्यातील सर्व ठाण्यांच्या पोलीसांना सतर्क करण्यात आले आहे. किनवट तालुक्यातील जलधरा तांडा येथील नरेंद्र परसराम पवार (३५) याने पत्नीचा खून केल्याचा गुन्हा इस्लापूर ता.किनवट पोलीसात गु.र.न. २५/२०१५ नूसार दाखल करण्यात आलेला आहे. सध्या तो नांदेड येथील कारागृहात बंदी होता. काही दिवसापासून तो आजारी असल्यामुळे पोलीस बंदोबस्तात त्यास अधिक उपचारासाठी १३ जून २०१७ रोजी नांदेड येथील शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु असतांना सायंकाळी ७:०० वाजताच्या दरम्यान तेथील आरोग्य कर्मचारी व बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचा-यांना त्यांने गुंगारा दिला आणि रुग्णालयातून पलायन केले आहे.तो पळाला का अन्य काही प्रकार आहे ? यावर प्रश्न चिन्ह ऊभे असून यामुळे त्याच्यासोबत कर्तव्यावर असलेले पोलीस चाैकशीच्या भोव-यात अडकले अाहेत.रुग्णालयातून पलायन केलेल्या या खूनी आरोपीच्या शोधार्थ जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे अधिकारी व पोलीसांना सतर्क करण्यात आले असून. या बाबद नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात अद्याप तरी कसलाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे किंवा नाही याची माहिती प्राप्त झालेली नाही.परंतू जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी हे दवाखान्यातून पलायन केलेल्या खूनी आरोपी नरेंद्र पवार याचा शोध घेत असल्याचे समजते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आलिया भटला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाला अटक

News Desk

“मोदी नसते, तर भारताचीही अवस्था अफगाणिस्तानसारखी”- कंगणा राणावत

News Desk

लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेने 72 तासात केला हत्येचा उलगडा

News Desk