HW News Marathi
क्राइम

तीन दिवसांपूर्वी जॉइन झालेल्या हैदराबादच्या आयटी इंजिनिअरची पुण्यात आत्महत्या

पुणेः हैदराबादहून तीन दिवसापूर्वीच नोकरीसाठी पुण्यात जॉइन झालेल्या तरुणाने आत्महत्या केल्याच धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. नोकरी टिकण्याची खात्री नसल्याने त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. गोपीकृष्ण दुर्गाप्रसाद असे या तरुणाचे नाव असून तो आयटी इंजिनिअर होता.

आंध्रप्रदेशमध्ये राहणारा २५ वर्षाचा गोपीकृष्ण दुर्गाप्रसादने पुण्यापूर्वी दिल्ली, हैदराबादमधील आयटी कंपनीमध्ये काम केले होते. तीन दिवसांपूर्वीच तो पुण्यातील आयटी कंपनीमध्ये कामाला लागला होता. कंपनीतर्फे त्याची विमान नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली होती. बुधवारी पहाटे गोपीकृष्णने हॉटेलच्या खोलीत हाताची नस कापण्याचा प्रयत्न केला. त्याने हाताच्या मनगटावर तब्बल २५ वेळा चाकूने वार केले. मात्र, हा प्रयत्न अपयशी ठरल्यावर तो हॉटेलच्या गच्चीवर गेला आणि तिथून उडी मारली. पहाटे चारच्या सुमारास हॉटेलच्या मॅनेजरने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. गोपीकृष्णला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मेहतांचे माजी सचिव सचिन पवारला हत्येप्रकरणी अटक

News Desk

सुट्टीमुळे दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस” २० मे रोजी साजरा करावा

News Desk

पुण्यात सेक्स रॅकेटचे प्रमाण वाढले

News Desk