HW News Marathi
क्राइम

पत्नीच्या हत्या प्रकरणी पतीला १० वर्षाची शिक्षा 

उत्तम बाबळे

नांदेड सावरगाव निपाणी ता.कंधार येथील एका विवाहिता पत्नीच्या चारीत्र्यावर संशय ठेऊन तिच्या अंगावर राॅकेल ओतून जीवंत पेटवून हत्या करणा-या निर्दयी पतीस सबळ पुराव्या आधारे कंधार जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधिश राजेंद्र काकाणी यांनी ४ जुलै रोजी १० वर्ष सक्त मजूरीची शिक्षा दिली आहे. कंधार तालुक्यातील माै.सावरगाव निपाणी येथील रहिवासी मिनाबाई संतोष सोनकांबळे हिच्या चारित्र्यावर संशय ठेऊन तिचा पती संतोष हौसजी सोनकांबळे हा तिला सतत मानसिक व शारिरीक त्रास द्यायचा.दि.३० जुलै २०१४ रोजी मिनाबाई संतोष सोनकांबळे हिला पती संतोष हौसजी सोनकांबळे यानें चारित्र्यावर संशय घेत मारहाण केली व तू मला दारु पिण्यासाठी पैसे का देत नाहीस म्हणत तिच्या अंगावर रॉकेल ओतले.एवढेच नाही तर तिला जीवंत पेटऊन दिले.यात मिनाबाई संतोष सोनकांबळे ही खुप भाजली गेली.यावेळी उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.उपचारा दरम्यान विशेष न्यायदंडाधिका-यांनी तिचा मृत्यूपुर्व जबाब नोंदविला होता.या जबाबावरुन कंधार पोलीस ठाण्यात निर्दयी पती संतोष सोनकांबळे विरुद्ध गुरन १२५/१४ नोंदी प्रमाणे खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.तपासाअंती कंधार पोलीसांनी २९ आॅक्टोंबर २०१४ रोजी कंधार अति.जिल्हासत्र न्यायालयात सदोष दोषारोपपत्र दाखल केले. सदरील खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील व आरोपीचे वकील यांच्या युक्तीवादा अंती साक्षीदार आणि मयत मिनाबाई संतोष सोनकांबळे हिच्या मृत्यूपूर्वी जबाबा वरून संतोष सोनकांबळे यास दोषी ठरऊन मा.जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र काकाणी यांनी दि.४ जुलै२०१७ रोजी संतोष सोनकांबळे विरुद्धचा गुन्हा सिद्ध झाल्यावरुन त्यास १० वर्षाची सक्त मजुरी व ५ हजार रुपये दंड अशी दुहेरी शिक्षा दिली.या खटल्यात सरकार पक्षातर्फे अति.सरकारी वकील अॅड.नीरज कोळनुरकर यांनी यांनी भक्कम युक्तीवाद केला.तसेच त्यांना न्यायालयातील पैरवी पोलीस कर्मचारी पो.काॅ.क्षीरसागर,केंद्रे व तरटे यांचे विशेष सहकार्य केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाच तोतया युवकांना पोलीसांनी केली अटक

News Desk

लोहा येथे तरूणाचा खून

News Desk

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज सीबीआय न्यायालयाने फेटाळला

Aprna