HW News Marathi
क्राइम

नांदेडच्या समाजकल्याण अधिकाऱ्यासह निरिक्षकाला 21 हजाराची लाच घेतांना अटक

– अधिकारी खामितकर याच्या नांदेड व सोलापूरच्या संपत्तीची चौकशी सुरू

नांदेड – आंतरजातीय विवाहासाठीचे अनुदान मंजूर करून देण्यासाठी 21 हजार रूपयांची लाच स्विकारतांना नांदेड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी आणि समाज कल्याण निरिक्षक अमोल श्रीमनवार यांना आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर खामितकर यांच्या नांदेड आणि सोलापूर इथल्या मालमत्तेच्या चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे.

आंतरजातीय विवाह करणा-या नवदांपत्यांना संसार थाटण्यासाठी राज्य शासनाकडून अडीच लाख रूपयांचे अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सन २०१६ मध्ये आंतरजातीय विवाह केलेल्या एका जोडप्याने नांदेड जि.प. समाज कल्याण विभागात रितसर अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांच्या अर्जावर गेल्या वर्षभरापासून कारवाई होत नव्हती. संबंधित अर्जदाराने याप्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर त्यांना प्रस्तावावर कारवाई करण्यासाठी एकून 21 हजार रूपयांची लाच मागितली. त्यापैकी श्रीमनवार याला 15 आणि सुनील खामितकर याला 6 हजार असा सौदा ठरला.

श्रीमनवार यांचा हा प्रस्ताव घेऊन संबंधित तक्रारदार हा खामितकर यांच्याकडे गेला. त्यावर श्रीमनवार यांनी सांगितलेली रक्कम जमा करण्याची सूचना खामितकर यांनी तक्रारदाराला केली. त्यानंतर तक्रारदाराने थेट नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंबंधीची तक्रार नोंदवली. त्यानुसार नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संजय लाठकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून पोलिस उपअधीक्षक संजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने श्रीमनवार याला 15 आणि 6 हजार रूपयांची लाच असलेली दोन स्वतंत्र पाकिटांसह अटक केली. काही वेळानंतर समाज कल्याण अधिकारी सुनिल खामितकर यांना छत्रपती शिवाजी चाैक परिसरातील त्यांच्या निवासस्थानातून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या दुस-या पकडले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बदलापुरात लहानग्याच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

News Desk

सासरच्यांनी जादुटोणासाठी सुनेचे मासिक पाळीतील रक्त विक्रीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया म्हणाले…

News Desk

पतीच्या डोळ्यसमोर पत्नीची प्रियकराकडून हत्या

News Desk