HW News Marathi
क्राइम

पतीच्या डोळ्यसमोर पत्नीची प्रियकराकडून हत्या

औरंगाबादः एकतर्फी प्रेमप्रकरणातून औरंगाबाद येथील महिलेची जालन्यात गळा चिरुन हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कल्पना रवींद्र खिल्लारे असे मृत महिलेचे नाव असून ती औरंगाबादच्या सातारा परिसरातील रहिवासी आहे. विशेष म्हणजे ती पतीसोबत चारचाकी गाडीतून प्रवास करीत असताना आरोपीने त्यांची गाडी थांबवून तिची हत्या केली.

रवींद्र खिल्लारे व पत्नी कल्पना बुधवारी रात्री 10वाजेच्या सुमारास इंडीका कारमधून जात असताना आरोपी सचिन सुपारकर याने त्यांची गाडी अडवली. त्यानंतर त्यांच्या पत्नी कल्पना यांना बाजुला नेऊन माझे तुझ्यावर प्रेम होते, तू त्याच्यासोबत लग्न का केले? असा सवाल करत कल्पनाच्या गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, शहरात 15 दिवसांपूर्वीच नितीन कटारिया या व्यापाऱ्याचा अशाच प्रकारे तिक्ष्ण हत्याराने वार करुन खून करण्यात आला होता. त्यापाठोपाठ ही घटना घडल्याला खळबळ उडाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदर्श प्रकरणात माजी लष्करी अधिकाऱ्यांचीही होणार चौकशी  

News Desk

चक्क ट्रक चोरी करून गुजरातला पळाले अन्…; पहा कसं पकडलं मुंबई पोलिसांनी

Chetan Kirdat

CGST ठाणे आयुक्तालयाकडून 8 कोटींचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट उघड

News Desk