HW News Marathi
क्राइम

नांदेड येथे गाेदावरी नदी काठी तरुणाचा खून

उत्तम बाबळे

नांदेड :- नांदेड येथील नगीना घाट, गोदावरी नदीच्या काठावर अज्ञात मारेकऱ्यांनी एका अनोळखी तरुणाचा निर्घुन खून करुन फेकून दिलेला मृतदेह आढळला आहे. हा तरुण कोण व खून कोणी केला ? हे शोधण्याचे आव्हान नांदेड पोलीसांपुढे उभे असून यास कोणी ओळखत असेल तर जनतेनी नांदेड पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

गगीना घाट,एनआरआय यात्री निवास बिल्गीग च्या पाठी मागे,गोदावरी नदीच्या काठावर अंदाजे २५ ते ३० वर्ष वय असलेल्या एका तरुणाच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्त्याराने गंभीर वार करुन त्याचा खून करुन उघड्या अवस्थेत फेकून दिलेले प्रेत ६ मे रोजी सकाळी मिळाले आहे.सदरील तरुणाचा खून दि.६ मे २०१७ रोजी च्या सकाळी ७:३० वाजताच्या पुर्वी झाला असावा असा प्रार्थमिक अंदाज त्याचे शवविच्छेदन करणा-या वैद्यकिय अधिका-यांनी वर्तविला आहे. मृतदेहाशेजारी रक्त साचलेले होते. पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अप्पर पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे, गृह पोलिस उपअधीक्षक विश्वेश्वर नांदेडकर, स्थानिक शाखेचे पोनि संदीप गुरमे, वजिराबादचे पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे, सहायक पोलिस निरीक्षक विनोद डिगोळे आणि इतर पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

सरकार पक्षातर्फे जमादार अशोक गीते, पोलीस ठाणे वजिराबाद,नांदेड यांनी फिर्याद दिल्यावरुन वजिराबाद पोलीसांत अज्ञात मारेकऱ्याविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वजिराबाद ,नांदेड पोलीस करत

आहेत.खून झालेल्या या तरुणाची अद्याप ओळख पटली नसून कोणी यास ओळखत असेल तर या अनोळखी तरुणाची माहिती संदीप गुरमे , पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड – ९९२३१०२२०० क्रमांकावर कळवावी असे आवाहन नांदेड पोलीसांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीड हादरले! भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणींची स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या

Aprna

दाऊदच्या खंडणी टोळीत राजकारण्यांची नावं

News Desk

इसिसचे पाच दहशतवादी केरळमधून अटकेत

News Desk