HW News Marathi
क्राइम

पेट्रोलपंप घोटाळ्यातील मोऱ्हक्या अखेर गजाआड

ठाणे- ठाण्यात इलेक्ट्रॉनिक चीपद्वारे पेट्रोल चोरी करणारा मुख्य सूत्रधार प्रशांत नूलकर याला अटक करण्यात पोलिसांना अखेर यश आले. ठाणे गुन्हे शाखेने ही कारवाई केली. मुख्य आरोपीला कर्नाटकमधील हुबळीमधून ताब्यात घेण्यात आले.

इलेक्टॉनिक चीप बसवून पेट्रोल चोरी करणारी टोळी पोलिसांनी गजाआड केली आहे. राज्यभर या टोळीने चीप विकली असून त्याद्वारे पंपमालक लाखोंची माया कमावत होते. परंतु ठाणे पोलिसांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश केला. चिपद्वारे होत असलेली पेट्रोलचोरी पकडण्यासाठी ठाणे क्राईम ब्रांचकडून राज्यभरात धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. मागील एक महिन्यात ठाण्यातील98 पेट्रोलपंप सील करण्यात आले. ठाणे क्राईम ब्रांचने मे महिन्यात प्रशांत नूलकरचा साथीदार विवेक शेट्येला अटक केली होती. त्यानेच या चिप देशभरातील पेट्रोल पंपावर पुरवल्या आहेत. प्रशांत नूलकर आणि विवेक शेट्ये यांच्यासह ठाणे पोलिसांनी यापूर्वी सहा जणांना अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणी केवळ चीप विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे. परंतु पंपमालकांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. पुरवठा विभागाची भूमिका देखील या प्रकऱणी तपासण्याची गरज असून त्यांचादेखील या घोटाळ्याला मूक पाठिंबा होता का, याची तपासणी करण्याची मागणी ग्राहकांतून होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Koregaon Bhima Violence | पाचही आरोपींच्या नजरकैदेत १७ सप्टेंबरपर्यंत वाढ

swarit

विनयभंग प्रकरणी ३ वर्षाची शिक्षा

News Desk

पुण्यात भामट्याने थाटले चक्क एसीबीचे बोगस कार्यालय

News Desk