HW News Marathi
क्राइम

पोलीस भरतीसाठी उमेदवाराची ‘डोकॅलिटी

मुंबई पोल‌िस भरतीमध्ये नकली केसांचा विग परिधान करून उंची वाढवणाऱ्या उमेदवाराला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना ताजी असतानाच, मुंबईत एका उमेदवाराने चक्क च्युइंगमच्या मदतीने स्ट्रइकर चिकटवून उंची वाढविण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. शनिवारी मरोळ येथे पोलिस मैदानावर भरतीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला.

मुंबईत पोलिस भरतीला सर्वाधिक जागा असल्याने राज्यभरातून अनेक उमेदवार आपले नशीब आजमवण्यासाठी येतात. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून नायगाव, मरोळ येथे पोलिस भरतीप्रक्रिया सुरू झाली होती. प्रत्येक दिवशी हजारो उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जात आहे. नाशिक येथील उमेदवाराने उंची वाढवण्यासाठी केसांचा विग लावल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर असा कोणताही प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी खास दक्षता घेतली आहे. संपूर्ण प्रक्रियेवर कॅमेऱ्यांची करडी नजर असून संशयित उमेदवारांवर नजर ठेवण्यासाठी खास पथकही तैनात करण्यात आले आहे.

हजारो तरुणांप्रमाणेच अमरावतीचा अनिकेत रावजी पोलिस दलात चांगली नोकरी मिळेल, असे स्वप्न उराशी बाळगून भरतीत उतरला होता. त्याने मैदानी आणि लेखी परीक्षेची गेल्या वर्षभरापासून तयारी केली होती. मात्र पात्रतेसाठी आवश्यक असलेल्या उंचीपेक्षा त्याची उंची अवघ्या एका इंचाने कमी होती. एक इंच उंची वाढावी म्हणून त्याने अनेक उपाय केले, मात्र सर्व प्रयत्न फोल ठरले.

मरोळ येथे सुरू असलेल्या पोलिस भरतीत शुक्रवारी छाती, उंचीची तपासणी होती. उंची वाढवण्यासाठी अनिकेतने केसांमध्ये च्युइंगमच्या मदतीने कॅरमची काळी सोंगडी चिटकवली होती. छाती, उंची मोजणीवेळी अनिकेत मैदानात आला होता. मात्र तो काहीसा भेदरलेला दिसत होता. उंची मोजत असताना एका पोलिस शिपायाने त्याच्या डोक्यावर फूटपट्टी टेकवली. त्यावेळी काही तरी टणक वस्तू अनिकेतने डोक्यात लपवली असल्याचा संशय त्याला आल्याने त्याने अनिकेतची झडती घेतली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, अनिकेवर पवई पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नोकराने मालकाच्याचं घरी केली चोरी. दिंडोशी पोलिसांनी 24 तासात इंदोरहुन केले अटक

News Desk

कॅडबरीत अळ्या, जरा सावधान..

News Desk

डोंबिवली बलात्कार : 33 आरोपींची नावं समोर, आतापर्यंत 28 जण ताब्यात

swarit