HW News Marathi
क्राइम

पोषण आहाराच्या गैरव्यवहारात दानवेंचा सहभाग

आपच्या नेत्या प्रीती मेनन यांचा आरोप

मुंबईः भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे भ्रष्ट कारभारामुळे पुन्हा एकदा अडचणीत आल्या आहेत. त्यांच्याकडील महिला व बालविकास विभागाने २०१६ मध्ये अंगणवाड्यांसाठी दिलेल्या ४५३९ कोटींच्या पोषण आहाराची १७ कंत्राटे बेकायदा असून काळ्या यादीतील तीन संस्थांना ही कंत्राटे दिल्याचा गंभीर आरोप आपच्या प्रीती मेनन-शर्मा यांनी केला. ज्या संस्थांना पोषण आहाराची कंत्राटे दिली त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या संस्था असल्याचे मेनन यांचे म्हणणे आहे.

एकात्मिक बालविकास सेवा (आयसीडीएस) योजनेतंर्गत लागणारा पोषण आहार ठेकेदारांकडून न घेता महिला बचत गटांकडून घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र, या आदेशाला हरताळ फासत पंकजा मुंडे यांनी खाजगी ठेकेदारांना कंत्राटे दिल्याचे मेनन यांनी सांगितले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्याने मागच्या वर्षी दिलेल्या ७७७ कोटी रुपयांच्या आहार कंत्राटांमध्ये ८८ टक्के रकमेची कंत्राटे फसवणुकीचे आरोप असलेल्या संस्थांना दिल्याचे मेमन यांचे म्हणणे आहे. धक्कादायक बाब म्हणजे दोन पुरवठादारांच्या कुटुंबीयांवर तर सीबीआय व अँटी करप्शन ब्युरोने घोटाळ्याचे गुन्हे नोंदवल्याचे मेनन यांनी सांगितले. २०१४ साली सर्वोच्च न्यायालयाने वाभाडे काढल्यावर आघार सरकारने चूक सुधारली. ३७५ महिला मंडळांना अंगणवाड्यासाठी आहार पुरवठ्याची कंत्राटे दिली. मात्र पंकजा यांनी २०१७ मध्ये जाचक अटी लादून ३७५ महिला मंडळांना कंत्राटाच्या प्रकियेतून डावलून बेकायदा संस्थांना कंत्राटे दिल्याचे मेनन यांनी सांगितले.

आर. डी. दानवे कोण ? :भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे स्वीय सहायक अतुल वझरकर हे मोरेश्वर या कंत्राट मिळालेल्या संस्थेमधील अधिकृत व्यक्ती आहेत. मोरेश्वरने आपल्या खात्यातून ५ लाख रुपयांचा एक व्यवहार केला आहे. तो आर. डी. दानवे यांच्या नावाने झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दादाराव दानवे हे आर. डी. दानवे आहेत का? याची चौकशी करण्याची मागणी मेनन यांनी केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपूर-चंद्रपूर महामार्गावर जनावरांची तस्करी करणाऱ्या गाडीने पोलिसाला चिरडले

News Desk

वीस लाख रुपये किमतीची कातडी जप्त

News Desk

जॅक निसटून ट्रक अंगावरुन गेल्याने चालकाचा जागीच मृत्यू

News Desk