HW News Marathi
क्राइम

बँक फोडणारा गजाआड

ठाणे: भिंतीला भगदाड पडून बँक लुटण्याच्या प्रयत्नात असणाºया एका टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग पोलिसांनी अटक केली आहे. झारखंड येथील ही टोळी असून पोलिसांनी त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला. विशेष म्हणजे या टोळीतील काही सहकारी किरकोळ फेरीवाला म्हणून काम करत असत त्यातच बँका किंवा मोठी सोन्याची दुकाने यांची टेहळणी करून त्यांना आपल लक्ष करत होते. या टोळीला गजाआड केल्यानंतर आता पोलिसांसमोर त्यांच्या इतर साथीदारांना पकडण्याच आवाहन उभे राहील आहे.

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील ओवळा कासारवडवली येथील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखे शेजारील राज मोटार ड्रायव्हिंग स्कुलच्या सामूहिक भिंतीला भगदाड पाडून लुटण्याचा प्रयत्न ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी हाणून पडला आहे. चोरीसाठी बँकेची भिंत फोडत असतानाच टोळीचा म्होरक्या साकिम शेखसह इतर ३ साथीदारांना रंगेहात अटक केली आहे. त्याच वेळेस बँकेच्या बाहेर चोरीच्या चारचाकी गाडीत लपून पोलिसांवर नजर ठेवण्यासाठी बसलेल्या ४ आरोपींनी तेथून धूम ठोकली. पोलिसांनी पाठलाख करून वायरलेसच्या माध्यमातून ठाणे, नाशिक रोड वरील घोटी येथे अटक केली. या झारखंडमधून आलेल्या टोळीचा म्होरक्या साकिम शेख, शाहजन ऊर्फ काळू शेख, मोहम्मद शेख, मकसूद शेख, शहाजान फजल शेख, रजाउल शेख, शेफउद्दीन शेख आणि जुगनू शेख यांना गजाआड करण्यात गुन्हे अन्वेषण शाखेला यश आल आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातून कृपाशंकर सिंह यांची सुटका

swarit

मुंबईत अनधिकृत तिकीट दलालांमुळं दहशतवाद्याचा प्रवास?

News Desk

अंबरनाथ गोळीबार प्रकरणी ३२ जणांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल

Chetan Kirdat