HW News Marathi
क्राइम

भाईंदरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

पाच आरोपींना अटक, तिघेजण अजूनही फरार

भाईंदर – भाईंदरमध्ये एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मागील आठ महिन्यापासून मुलीवर सतत बलात्कार होत असल्याचं उघड झालं आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समजते आहे. नवघर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून तर तीन आरोपी अजूनही फरार आहेत.

एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर त्याच परिसरात राहणाऱ्या आठ मुलांनी अत्यंत अमानुषपणे बलात्कार केल्याची तक्रार नवघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पीडित मुलगी अडीच महिन्याची गर्भवती राहिल्यानंतर ही बाब समोर आली. त्यानंतर पीडीत मुलीच्या पालकांनी पोलिसात गुरूवारी रात्री गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी, पोलिसांनी अमर सिंग, सुनील यादव, राजू पाटील, सुनील बोथ, राहुल यादव, पवन विश्वकर्मा, आणि एक अनोळखी इसम तसेच अल्पवयीन आरोपी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पाच आरोपींना अटकही करण्यात आली आहे.

पीडीत मुलीच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. याचाच फायदा त्याच परिसरात राहणाऱ्या मुलांनी घेतला. गेले आठ महिने आरोपींनी या मुलीवर अमानुष अत्याचार केला. तसंच या प्रकरणाची कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही तिला दिली.

दरम्यान, अटक केलेल्या आरोपीना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. तर एका अल्पवयीन आरोपीला भिंवडीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. पीडीत मुलीवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणी जालन्यातून आणखी एक जण ताब्यात

News Desk

आदिवासी वि. प्र.लिपीक रमेश मुंडकर लाच घेताना रंगे हात अटक

News Desk

रश्मी शुक्लांविरोधात महत्त्वाचे तपशील हाती असल्याचा दावा

News Desk
मुंबई

भाजपकडून सतत ऑफर – नारायण राणे

News Desk

अनिरूद्ध गायकवाड

मुंबई – नारायण राणे यांनी बुधवारी अहमदाबादमध्ये भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने भाजपामध्ये प्रवेश करण्याचं वृत्त येत होतं. यानंतर मुंबईत परतलेल्या नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत आपण कोणाचीही भेट घेतली नसल्याचं सांगत सर्व बातम्या फेटाळून लावल्या. मला भाजपाची जुनीच ऑफर आहे, ते सारखे विचारतच असतात, मी त्यांना हो ही बोललो नाही आणि नाहीही बोललो नाही अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंनी दिली आहे. हल्ली तुम्हाला भाजपाने ऑफर दिली आहे का ? असं विचारलं असता त्यांनी यावर भाष्य करणं टाळलं.

नारायण राणे यांनी आपण काल अहमदाबादमध्ये होतो, मात्र कोणालाही भेटलो नाही असा दावा केला आहे. एकाच गाडीतून प्रवास करण्याबद्दल विचारलं असता राणेंनी खोटं ठरवत प्रश्नांना बगल दिली. तसंच विमानतळापासून हॉटेलपर्यंत माझ्या गाडीने प्रवास केल्याचं त्यांनी सांगितलं. ‘ग्रँड हयात हॉटेलमध्ये 10.30 माझी वाजता मीटिंग होती. उशीर झाल्याने रात्री हॉटेलमध्ये थांबलो होतो. त्यानंतर सकाळी पावणेसात वाजताच्या विमानाने मुंबईला परत आलो’, अशी माहिती नारायण राणेंनी दिली आहे.

आपली बाजू मांडताना याआधीही मी मुख्यमंत्र्यांसोबत दोनदा विमान प्रवास केला आहे. एकदा औरंगाबादला दानवेंच्या मुलाच्या लग्नाला जात असताना आणि दुस-यांदा बावनकुळेंच्या मुलींच्या लग्नाला गेलो होतो असं नारायण राणेंनी सांगितलं. काँग्रेसविरोधात नाराजी दाखवण्यात आल्याने हे वातावरण निर्माण झालं असल्याचंही राणे बोलले आहेत. भाजपा ऑफरबद्दल विचारलं असता ‘मला भाजपाची जुनीच ऑफर आहे, ते सारखे विचारतच असतात. पण मी विचार केलेला नाही. मी त्यांना हो ही बोललो नाही आणि नाहीही बोललो नाही’, असं राणेंनी स्पष्ट केलं आहे.

जर पक्ष बदलायचाच असता, तर आधी भेटायला गेलो नसतो, थेट निर्णय घेतला असता असं राणे बोलले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि शहांना भेटलो असतो, तर लपून राहिलं असतं का? असा सवालही राणेंनी यावेळी विचारला. ‘रात्री साडेदहानंतर कुठेही जात नाही, त्यामुळे त्यांना भेटण्याचा प्रश्नच नाही. मी अमित शहांच्या घरी गेलो म्हणता, मग तिथून बाहेर पडताना वगैरे व्हिडीओ आहे का?’, असा उलट सवाल राणेंनी प्रसारमाध्यमांना विचारला.

Related posts

जाणून घ्या…बेस्ट प्रशासनाच्या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे

News Desk

श्रीदेवींचे पार्थिव आज दुबईहून मुंबईत दाखल होणार

swarit

मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला आत्मपरिक्षणाचा सल्ला 

News Desk