HW News Marathi
क्राइम

मोठेगाव दलित महिला हत्याकांड निषेधार्थ रिसोडात भीम टायगर सेनेचा रास्तारोको

विनोद तायडे

वाशिम – वाशिम जिल्ह्यातील रिसोड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोठेगावात दलित महिला जळीत हत्याकांडाच्या निषेधार्थ भीमटायगर सेनेने रिसोड शहरात दि 16 मार्चला रस्ता रोको आंदोलन छेडले

मोठेगाव येथील दलित महिलेवर 7 नराधमांनी रात्रीच्या सुमारास बलात्कार करून जिवंत जाळून मारले.घटनेनंतर एका महिन्यांनी पोलिसांनी केवळ एकाच आरोपीला अटक केली उर्वरीत आरोपीना त्वरित अटक करण्यात यावी.मृतक महिलेला न्याय देण्यात यावा आदी मागण्यांसाठी भीम टायगर सेनेने लोणी फाट्यावर ,प्रचंड घोषणाबाजी करत रास्तारोको आंदोलन छेडले. तब्बल दोन तास वाहतूक ठप्प होती यावेळी भीम टायगर सेनेचे तालुका अध्यक्ष राहुल जुमडे,विशाल शेटाणे,बंडू शेजुळ,धीरज जुमडे, निलेश आंबेकर,अक्षय खंडारे, सतीश बांगर,आकाश मोरे,रत्नमालाबाई जुमडे,पूनम पडघान,माया मोरे सह शेकडो महिला पुरुष रस्त्यावर उतरले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सायबर सुरक्षा प्रकल्पाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

Aprna

अमेरिकेचा सिरियावर हल्ला, ४२ ठार

News Desk

२५ विद्यार्थ्यांची हजामत, शिक्षकांवर गुन्हा

News Desk