HW News Marathi
क्राइम

ठाण्यात सापडला स्फोटक साठा, तिघांना अटक

ठाणे – आर्थिक वादातून प्रतिस्पध्र्याला नामोहरम करण्यासाठी जमविण्यात आलेली स्फोटके सोमवारी मुंब्रा पोलिसांनी हस्तगत केली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुंब्रा-पनवेल मार्गावरील गौसिया कंपाऊंडसमोर एम. डी. डेव्हलपर्सच्या आवारात एका भंगार कारमध्ये पोलिसांना प्लास्टिकच्या गोणीमध्ये १० किलो अमोनियम नायट्रेट आणि पिवळय़ा रंगाची वायर लावलेले ९ सुप्रिम डिटोनेटर्स बेवारस स्थितीत आढळले. स्फोटकांचा साठा असल्याची माहितीमिळाल्यावर रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास रेल्वे सुरक्षा दल, दहशतवादविरोधी पथक आणि शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी ही संयुक्त कारवाई केली होती. त्यानंतर अवघ्या दहा तासांत याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली. महिंसा राजेसाब गणुर उर्फ महेश (४०),शहाआलम मेहमूद शेख (३२) आणि आरिफ नवाबअली खान (२३) ही आरोपींची नावे असून, तिघेही मुंब्रा येथील रहिवासी आहेत.

आरोपी महेश याचा जुन्या गाड्यांची खरेदी-विक्री करणारे मुंब्रा येथील रहिवासी इस्माईल शेख यांच्याशी आर्थिक वाद होता. त्यांना गंभीर गुन्ह्यात अडकवण्यासाठीच आरोपींनी हे कटकारस्थान रचले होते, अशी माहिती पोलीस उपायुक्त सत्यनारायण आणि डॉ. डि.एस. स्वामी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंदाकिनी खडसे यांना तूर्तास दिलासा…

News Desk

जालन्यामध्ये कुंटणखान्यावर कारवाई; ७ महिलांसह ३ जण अटक

News Desk

लहान मुलांच्या वादात मोठ्यांची हाणामारी

News Desk