HW News Marathi
क्राइम

विवाहितेला दोन महिने डांबून ठेवून बलात्कार

औरंगाबाद – एका विवाहितेचं अपहरण करून दोन महिने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपी प्रकाश मधुकर नरवडे याच्याविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी पोलिसांनी नरवडे याला ताब्यात घेतले.

मुकुंदवाडी परिसरातून पीडित विवाहितेचे अपहरण करून तिच्यावर दोन महिने बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पीडितेने आईला फोन केल्यानंतर पोलिसांच्या मदतीने या नरक यातनांतून तिची सुटका झाली.

पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, २०१६ मध्येही पीडितेने त्याच्याविरोधात बलात्कार केल्याप्रकरणी तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला होता. २६ फेब्रुवारी २०१७ रोजी पीडिता मानलेल्या भावासोबत एका हॉटेलमध्ये असताना प्रकाश नरवडे याने तिला बळजबरीने संतोषीनगर येथील घरी नेले. पत्नी घरी न आल्याने तिच्या पतीने मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार दिली. परंतु तिच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देत प्रकाशने पीडितेकडून मी आपल्या मर्जीने प्रकाशसोबत राहत आहे, असे पोलिसांना लिहून देण्यास भाग पाडले. त्यानंतर प्रकाशने पीडितेचा मोबाइल काढून घेत मुंबई, औरंगाबाद आदी ठिकाणी नेऊन अत्याचार केला.

पीडितेने संधी साधून आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. प्रकाश आपल्याला घराबाहेर निघू देत नाही. डांबून ठेवून अत्याचार करत असल्याचे सांगितले. पीडितेच्या आईने हा प्रकार मुकुंदवाडी पोलिसांना कळवल्यावर पोलिसांनी २६ एप्रिल रोजी तिची सुटका केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पत्नीच्या हत्या प्रकरणी पतीला १० वर्षाची शिक्षा 

News Desk

माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांना जीवे मारण्याची धमकी

News Desk

धारावीत तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी चौघांना अटक

swarit