HW News Marathi
क्राइम

शाळकरी मुलीवर अत्याचार, पाथर्डीत रास्तारोको

पाथर्डीः तालुक्यातील मांडवे गावातील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे़. या प्रकरणाती आरोपीला अटक करावी, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तसेच पाथर्डी बस स्थानकात दगडफेक करण्यात आली़.

पाथर्डी तालुक्यातील मांडवे हे गाव तिसगावजवळ आहे़. ही मुलगी तिसगाव येथील एका शाळेत इयत्ता सातवीत शिकत होती़. मांडवे येथून शाळा तीन किलोमीटर अंतरावर आहे़. या शाळेत ५० टक्के मुले मांडवे येथील आहेत़. अत्याचारग्रस्त मुलीच्या आईने या मुलीला शाळेत जाण्यासाठी एका अज्ञात इसमाच्या गाडीवर बसवून शाळेत पाठविले होते. या अज्ञात इसमाने आडमार्गी गाडी नेऊन या मुलीवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. अत्याचार केल्यानंतर या इसमाने तिसगाव चौकात पीडित मुलीला आणून सोडले़. तिथे ही मुलगी मोठ्याने रडायला लागली़ होती. त्यानंतर लोकांनी चौकशी केली असता ही घटना उघकीस आली़. दरम्यान, या प्रकरणी संतप्त नागरिकांनी तिसगाव येथील वृद्धेश्वर चौकात रास्ता रोको करण्यात आला़. या प्रकरणातील आरोपीला अटक करावी, या मागणीसाठी पाथर्डीत दगडफेक करण्यात आली़.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ट्रॅव्हल्समधील अश्लील व्हिडिओ प्रकरणी, भाजपच्या पदाधिकाऱ्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी

News Desk

मीरा भाईंदरच्या काशीमिरामधून अमली पदार्थ तस्कराकडून 19 लाखांचे मेफेड्रोन (MD) जप्त

Chetan Kirdat

VLC Media Player भारतात बंदी, वेबसाइट आणि VLC डाउनलोड लिंक ब्लॉक

News Desk