HW News Marathi
क्राइम

शिवसेना नगरसेवकावर बलत्काराचा गुन्हा दाखल

ठाणे – महिलेला तिच्या भावजयीने बळकावलेले तिच्या आईचे घर मिळवून देण्याचे आमिष दाखवून उल्हासनगर महापालिकेचे शिवसेना गटनेत्याने तिच्यावर जबरी अत्याचार केला. त्यानंतर तिला मारहाण केल्याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष मनसुलकर असे त्या बलात्कारी नगरसेवकाचे नाव आहे.

कल्याण पूर्व येथील काटेमानीवली परिसरातील एका महिलेच्या भावजयीने तिच्या आईचे घर बळकावले होते. ते घर तिच्याकडून मिळून देण्यासाठी ती महिला नगरसेवक सुभाष मनसुलकर याच्याकडे गेली होती. त्यावेळी मनसुलकर याने त्या महिलेला तुझ्या आईचे घर मिळवून देतो असे बोलून त्या महिलेकडून तिच्या आईच्या घराचे कागदपत्राच्या झेरॉक्स प्रत ताब्यात घेतल्या. ते घर खाली करुन देतो असे बोलून त्याने जानेवारी महिन्यात ३ वेळा तिच्यावर जबरी अत्याचार केला. त्या महिलेने तिच्या आईच्या घराची कागदपत्राची झेरॉस प्रत मागण्यासाठी मनसुलकर यांच्या ऑफिसमध्ये गेली. यावेळी त्यांनी तिला शिवीगाळ व दमदाटी करुन, तिचा हात पिरगळून तिला जखमी केले. अशी तक्रार त्या महिलेने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात केली. त्या तक्रारीवरुन नगरसेवक सुभाष मनसुलकर याच्याविरुध्द दाखल केली आहे. अधिक तपास विठ्ठलवाडी पोलीस करीत आहेत. ऐन निवडणूकीत शिवसेनेच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साईबाबांवरील वादग्रस्त वक्तव्य भोवलं! बागेश्वर बाबांविरोधात मुंबईत तक्रार दाखल

Aprna

अखेर अमरावतीतील ‘ती’ तरुणी साताऱ्यात सापडली; पोलीस आज घरी आणणार

Aprna

मामी आणि भाच्याच्या नात्याला काळिमा; साकिनाकात मामाच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून दोघांना अटक

Aprna