HW News Marathi
क्राइम

दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीला सजावट; राम कदमांनी ट्वीट करत मविआ सरकारवर साधला निशाणा

मुंबई | 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील कुख्यात दहशतवादी याकूब मेमनच्या (Yakub Memon) कबरीला एलईडी लाईट्स आणि संगमरवर फरशीने सजावट करण्यात आल्याची माहिती धक्कादायक एबीपी माझाने उघडकीस केली आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या (Police) एक पथक काल (7 सप्टेंबर) रात्री मरीन लाईन्सच्या बडा कब्रस्तानमध्ये जाऊन कबरीवरील एलईडी लाईट्स काढल्या आहेत. या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे अधिकार जाणार आहेत. याकूब मेमनच्या कबरीवर एलईडी लाईट्स आणि संगमरवरी फरशी लावणाऱ्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एबीपी माझाच्या माध्यमातून मिळाली आहे.

या कब्रस्तानातील वीज जोडणीद्वारे याकूब मेमनच्या कबरीला लाइट्स लावण्यासाठी वीज पुरवठा केला जात आहे. याकूब मेमनला 1993 मुंबई बॉम्बस्फोटात दोषी ठरविले होते. यानंतर याकूब मेमनला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात ३० जुलै २०१५ रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली होती. यानंतर याकूब मेमनला मरीन लाईन्स बडा कब्रस्तानमध्ये त्याला दफन करण्यात आले. या कब्रस्तानची ही जागा दफनभूमी बोर्डाच्या अखत्यारित येत आहे.

या सर्व प्रकरणावर भाजपचे आमदार राम कदम यांनी ट्वीट करत महाविकासआघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निशाणा साधला आहे. राम कदम यांनी ट्वीट करत म्हटले, “उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, त्या काळात पाकिस्तानच्या इशाऱ्यावर मुंबईत १९९३ मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या याकुब मेमनच्या समाधीचे रूपांतर झाले. हेच त्यांचं मुंबईवरचं प्रेम, हीच त्यांची देशभक्ती? उद्धव ठाकरेंसह शरद पवार, राहुल गांधींनी मुंबईकरांची माफी मागितली”, असे सवाल उपस्थित केला आहे. तर राम कदम यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये याकूब मेमनच्या कबरीचे पूर्वीचे आणि आताचे फोटो ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मॉडेलने मित्रासोबत सेल्फी काढल्याने प्रियकराने केला बलात्कार करण्याचा प्रयत्न

News Desk

आमदार बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी; मुंबईच्या गिरगाव न्यायालयाचा निर्णय

Aprna

आमदार हर्षवर्धन जाधव यांना 2 वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रूपये दंड

News Desk