HW News Marathi
क्राइम

3 लाख चोरी करणारे आरोपी अटक

मुंबई शनिवारी मध्यरात्री एस.व्ही रोड परिसरातून पिगमी एंजेट पैसे घेऊन जातना दोन अनोळखी बाईकर्सने हातातील पैश्याची बॅग घेऊन पसार झाले होते. बॅगेत तीन लाख पन्नास हजार रूपये होते. याप्रकरणी सुर्यंकात यांनी जेजे पोलिस ठाण्यात तक्रार केली. यातक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून 24 तासात दोन आरोपीना अटक केली असून त्याच्याकडून रोख रक्कम जप्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री 1 वाजता एश्वर्या नागरी सहकारी पतपेढीत पिगमी एजेंट सुर्यकांत एस.व्ही. रोडवरून पैसे घेऊन दुचाकीवर जात असताना अनोळखी दुचाकीस्वारांनी हातातील बॅग घेऊन पसार झाले होते. यारकरणी सुर्यंकांत यांनी जेजे पोलिस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपींना अटक केली आहे या आरोपींना डोगरी आणि चोर बाजार परिसरातून अटक करून त्यांच्याकडी रोख रक्कम जप्त केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पकडून देणाऱ्यास NIA कडून 25 लाखांचे बक्षीस जाहीर

Aprna

अनिल देशमुखांच्या नागपुरातील निवासस्थानी सीबीआयची पुन्हा छापेमारी…

News Desk

उपसरपंचाचा निर्घृण खून

News Desk
देश / विदेश

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कर्णन यांच्या अटकेचे सर्वोच न्यायालयाचे आदेश 

News Desk

 

  • भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना

अक्षय कदम/ वृत्तसंस्था

नवी दिल्ली – आज सुप्रीम कोर्टाने एक अभूतपूर्व निकाल दिला, कोलकाता उच्च न्यायालयाचे विदयमान न्यायाधीश सी एस कर्णन यांच्याविरोधात कोर्टाच्या अवमान प्रकरणी सुप्रीम कोर्टाने जामिनपात्र गुन्हा दाखल केला असून 31 मार्चपूर्वी हजर राहण्याचे आदेश दिले.

भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील ही पहिली घटना म्हणावी लागेल जिथे चक्क उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवरच न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मुख्य न्यायाधीश जे.एस. खेहार यांच्या अध्यक्षतेखालील सात न्यायाधीशांच्या पीठाने कर्णन यांच्याअनुपस्थितीत विरोधात पश्चिम बंगालचे पोलिस महासंचालक यांना पत्र पाठवून कर्णन यांना 31 मार्च रोजी सुप्रिम कोर्टात हजर राहण्यास सांगितले आहे. यासंदर्भात सात सदस्यीय पीठाने मुख्य न्यायाधीशांसोबत 15 मिनिटे चर्चा करून पुढील कारवाईबाबतचा निर्णय घेतला. कर्णन यांनी संबंधित न्यायाधीशांबाबत केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. यासंदर्भात कर्णन यांनी फॅक्स केलेले पत्र त्यांची बाजू म्हणून ग्राह्य धरण्यास नकार देण्यात आला असून कर्णन यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सांगितले की, न्यायाधीश कर्णन यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला असल्याने त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.

Related posts

Watch Video : हत्तींची रुग्णालयातील सफारी एकदा पहाच

Manasi Devkar

पवार विरोधी पक्षात असते तर त्यांनी ढोंगीपणा आणि नाटकं केली असती !

Arati More

इस्रोची अंतराळ भरारी ! भारतासह ८ देशांच्या ३० उपग्रहांचे महाउड्डाण

News Desk