HW News Marathi
क्राइम

गुड्ड्यावर सपासप वार करणारा आरोपी अटकेत

टोळी युद्धातून गुड्ड्याची हत्या.. धुळेःकुख्यात गुंड गुड्ड्यावर तलवारीने हल्ला करून त्याचा खून करणाऱ्या प्रमुख आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. भद्रा ऊर्फ राजेश रमेश देवरे व विलास ऊर्फ छोटा पापा गोयर असे त्या आरोपींचे नाव आहे. त्यांनी अटक होण्याच्या भितीने इंदूरमध्ये पलायन केले होते. ओळख लपवण्यासाठी भद्रा देवरेने टक्कल केले होते. गुड्ड्याचा खून केल्याचे कुठलेही शल्य त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हते. किंबहून ते अटक केल्यानंतर स्थानिक बोलीभाषेत हास्य विनोद करत होते. दरम्यान, गुड्ड्याचा खून केवळ टोळी युद्धातून झाल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.

कुख्यात गुंड गुड्ड्या ऊर्फ रफियोद्दीन शेख याचा १८ जुलै रोजी सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास होटेल गोपाल टी हाऊस येथे निर्घृण खून झाला होता. त्यानंतर मारेकरी फरार झाले होते. त्यांच्या तपासासाठी राज्यातील विविध भागांत पोलिसांची आठ पथके रवाना झाली होती. या पथकाने पुण्यातील कामशेतमधून सागर पवारला अटक केली होती. त्यानंतर कासारे येथून अभय ऊर्फ दादू देवरे, खांडव्यामधून गणेश बिवाल, दोंडाईचा येथील योगेश जगताप, विकी वाचरे, नंदुरबारमधून पारस घारू यांना अटक केली होती. त्यानंतर इंदूरमधून मुख्य सूत्रधार विलास ऊर्फ छोटा पापा श्याम गोयर आणि राजेश ऊर्फ भद्रा रमेश देवरे या दाेघांना अटक केली आहे. दोघांना एलसीबी अाणि देवपूर पाेलिस ठाण्याच्या पथकाने पकडून आणले. इंदूर येथे राजेश ऊर्फ भद्रा देवरे ट्रॅव्हल्सने येणार असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली होती. त्यानुसार पहाटे तीन वाजेच्या सुमारास देवपूर पाेलिस ठाण्याचे निरीक्षक किशाेर शिरसाठ,उपनिरीक्षक रामकृष्ण साेनवणे, पाेलिस नाईक पंकज चव्हाण, पाेलिस काॅन्स्टेबल कबीर शेख यांनी त्याला पकडण्यासाठी इंदूर बायपास रस्त्यावर सापळा रचला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलिसांकडून आरोपीची हत्या

News Desk

दहेलीत मटका अड्ड्यावर छापा,११ जण अटक

News Desk

दोन सख्या बहिणींना ब्लॅकमेल करून केला बलात्कार

News Desk