HW News Marathi
क्राइम

दहेलीत मटका अड्ड्यावर छापा,११ जण अटक

उत्तम बाबळे नांदेड :- पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांना स्थापलेल्या विशेष पोलीस पथकाने आता आपला मोर्चा मटका जुगाराकडे वळविला असून १९ जून रोजी या पथकाने दहेली ता.किनवट येथील मटका जुगार अड्ड्यावर छापा मारला आहे.या कारवाईत ११ जणांसह ४४ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.मुद्देमाल भले ही कमी मिळाला असला तरी विशेष बाब म्हणजे विदर्भातील आर्णीच्या मटका किंगने मराठवाड्यात आपले जाळे पसरविल्याचे या कारवाईतून उघड झाले आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील दुर्गम भागातील तालुका म्हणून किनवटची ओळख आहे.आणि या किनवट विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार यांचे गाव म्हणजे दहेली ता.किनवट.दुर्गम भागातील या गावात मटका जुगार अड्डा चालविला जात आहे अशी गोपनिय माहिती विशेष पोलीस पथकाला मिळाल्यावरुन १९ जून २०१७ रोजी पथक प्रमुख सहाय्यक पो.नि.ओमकांत चिंचोलकर व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी लाठकर, जगताप,खंदारे,कुलकर्णी,पायनापल्ले, निरणे,जिंकलवाड,गंगुलवार, आवातिरक आणि चालक देवकत्ते यांनी दुपारी ३:०० वाजताच्या दरम्यान प्रमोद काळे यांच्या दहेली गावालगतच्या शेतातील मोकळ्या जागेत ऊभारण्यात आलेल्या झोपडीवर छापा पारला असता तेथे आकडे लाऊन मटका जुगार खेळवितांना व खेळतांना काही जण मिळाले.यात ३ एजंट,७ खेळाडू व १ मुख्य खेळविणारा मालक असे एकूण ११ जण मिळाले.यावेळी त्यांच्याकडे मिळालेली रोख रक्कम,मटका जुगाराचे साहित्य व एक मोटार सायकल असा एकूण ४४ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल मिळाला.तसेच त्या ११ जणात जीवन नारायण बादणुरे (३६),शिवाजी मोरे(४५),किशोर कांबळे (४५),प्रमोद काळे (३२) हे सर्वजण रा.दहेली ता.किनवट.रमेश येरेकर (४०) रा.वझरा ता.किनवट,रामजी मोगरे (३५) रा.चिंचखेड ता.किनवट,गणपत खामनकर (६०) रा.दुंड्रा,संजय चव्हाण (४०) रा.लसनवाडी,जयवंत राठोड (६५) रा.निचनूर,आनंद कनाके (६५) रा.सारखणी,जयाराम मारोती तुकाराम (४०) रा.चिंचखेड ता.किनवट यांचा समावेश आहे.या ११ जणांसह ४४ हजार २०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व सहाय्यक पो.नि.ओमकांत चिंचोळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन उपरोक्त ११ जणाविरुद्ध मुंबई जुगार कायद्यानुसार किनवट पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील कारवाईतील विशेष बाब म्हणजे विदर्भातील आर्णी येथून मराठवाडा नांदेड जिल्ह्यातील माहूर,किनवट,हदगाव व हिमायतनगरसह अन्य तालुक्यात मटका जुगाराचे जाळे पसरविणा-या मटका किंग मारबाटे याचे विदर्भ – मराठवाडा कनेक्शन उघडकिस आले आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास किनवट पोलीस करत असून मटका जुगारातून अनेकांचे संसार उध्वस्त करणा-या विदर्भ मटका किंगचा शोध हे विशेष पोलीस पथक घेत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कौटुंबिक वादातून चार जणांची हत्या 

swarit

3 लाख चोरी करणारे आरोपी अटक

News Desk

गर्भलिंग निदान करणाऱ्या आरोपींना 14 दिवसांची कोठडी

News Desk