मुंबई | सांगलीमधील (Sangli) जत तालुक्यात लवंगा गावात मुले चोरण्याची टोळीच्या संशयावरून चार साधूना मारहाण करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे राज्यभरात एकच खळबळ माजली. या साधूना मारहाण करणाऱ्या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत कारवाई करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आतापर्यंत 6 आरोपींना ताब्यात घेतले असून पोलीस अजून 10 ते 12 आरोपींचा शोध करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.
या घटनेनंतर पालघरमधील साधू हत्याकांडाची घटना आठवली का? दोन वर्षांपूर्वी पालघरमध्ये घडलेल्या साधूंच्या हत्याकांडाने संपूर्ण देशभर खळबळ उडाली होती. या घटनेचे पडसाद अजूनही उमटत आहेत. पण, अशीच घटना आता सांगली जिल्ह्यातही चार साधूंना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली असून या साधूंना मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुदैवाने पालघरसारखी घटना होता-होता टळली.
उत्तर प्रदेशातील मथुरा येथून हे चार साधू हे कर्नाटकातील देवदर्शनासाठी गेले होते. यानंतर हे साधू विजापूरवरुन सांगलीमधील जत तालुक्यात लवंगामार्गे पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले होते. या साधूनी गावातील एका मुलाला रस्ता विचारला होता. परंतु, या तरुणाला हे चार साधू मुले चोरणारी टोळी असल्याचा संशय आला आणि तरुणाने ही माहिती गावकऱ्यांना दिली. यानंतर गावकऱ्यांनी चार साधूना संशयावरून गाडीतून ओढत बाहेर काढून बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेतली. या प्रकरणावर पोलिसांनी कारवाई करत सहा जणांना अटक केले आहे. या प्रकरणावर भाजपा आमदार राम कदम यांनी ट्वीट करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावर राम कदमांनी
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.