HW News Marathi
क्राइम

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची चौकशीत NCB ला कबुली, म्हणाला-

मुंबई | एनसीबीने मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका आलिशान क्रुझवर छापा टाकत ड्रग्स पार्टीचा पर्दाफाश केला. सुमारे 7 तास चाललेल्या छाप्यादरम्यान, एनसीबीनं मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त केली आहेत. एनसीबीनं यात एकूण 8 जणांना ताब्यात घेतलं असून त्यात दोन महिलांचाही समावेश आहे. तसंच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. आर्यन खानची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली.

आर्यननं ड्रग्सचं सेवन केल्याचंही कबूल केलं

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानने कबूल केले की तो या पार्टीचा भाग होता. त्यानं आपण चूक केल्याची कबुलीही दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यननं ड्रग्सचं सेवन केल्याचंही कबूल केलं आहे. त्याचवेळी, सूत्रांनी पुढे असंही सांगितलं आहे की, अभिनेता शाहरुख खानने एनसीबीच्या ताब्यात असलेल्या आपल्या मुलाच्या सुटकेसाठी प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे यांच्याशी संपर्क साधला आहे. ज्यांची टीम सध्या एनसीबीच्या कार्यालयात हजर आहे. दरम्यान, यासंदर्भात शाहरुख खानकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बालगृहातील मुलानं केली आत्महत्या

News Desk

पोलिसांमुळे महिला वकिलाचा आत्महत्येचा प्रयत्न फसला

News Desk

जितेंद्र आव्हाडांच्या जामीन अर्जावर लवकरच निकाल

Aprna