HW News Marathi
क्राइम

भूयार खोदून बँक ऑफ बडोदा फोडली

मुंबईः नवी मुंबईत जुई नगर येथे काही दरोडेखोरांनी भूयार खोदून बँक लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जुई नगर सेक्टर-११ मध्ये बँक ऑफ बडोदावर दरोडा पडल्याचे आज सकाळी उघडकीस आले. शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्याने बँक बंद होती. आज सकाळी बँक उघडण्यात आली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. बँकेच्या बाजूला असलेलेल्या दुकानातून भुयार खोदून दरोडेखोरांनी या बँकेत प्रवेश केला.

यानंतर तिजोरी फोडून त्यातील रोख रक्कम चोरून नेली आहे. दरोडेखोरांनी नेमकी किती रक्कम लंपास केली याची माहिती मिळू शकली नाही. बँकेच्या शेजारी असलेल्या दुकानात या भुयाराचे उगमस्थान आढळून आलंय. त्यामुळे या दुकानाचा मालक आणि दुकानातील नोकरांची चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतं. हे भुयार एका रात्रीत खोदलं गेलं नाही. त्यासाठी अनेक दिवस लागले असतील. पूर्ण प्लॅनिंग करूनच एखाद्या टोळीने हे भुयार खोदलं असावं, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं. एवढं मोठं भुयार खोदलं जात असताना आसपासच्या परिसरातील लोकांना त्याचा सुगावा कसा लागला नाही? यावर पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कौमार्य चाचणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, पुण्यात तिघांवर हल्ला

swarit

बलात्कार प्रकरणी आसाराम बापूचा मुलगा नारायण साईला जन्मठेपेची शिक्षा

News Desk

बचपन बचाव आंदोलन मुलांचे संरक्षण करणारे कायदे सक्षम करण्याची मागणी

swarit