HW News Marathi
क्राइम

भैय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणी ३ जणांना अटक

मुंबई | भैय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केले आहे. महाराजांचा सेवादार विनायक दुधाले, शरद देशमुख आणि पलक अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या तिघांवर भैय्यू महाराजांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे, अशी माहिती पोलिस उपमहानिरीक्षक एच. सी. मिश्रा यांनी दिली आहे.

भैय्यू महाराजांनी गेल्या वर्षी २१ जून २०१८ रोजी इंदोर येथील आपल्या राहत्या घरी स्वतः गोळी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणी अटक केलेल्या पलक या महिलेने महाराजांना ब्लॅकमेल करून तिच्याबरोबर लग्न करण्यासाठी दबाव घातला होता. यासाठी या महिलेला विनायक आणि देशमुख याने मदत केली होती, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.

तिघांनी षडयंत्र रचून महाराजांना ब्लॅकमेल करून शोषण केले. यामुळे महाराजांनी आत्महत्या केल्याचे भैय्यू महाराज यांची पत्नी आयुषी हिने पोलिसांनी दिलेल्या जबानीत म्हटले आहे. या प्रकरणी अधिक मिळालेल्या माहितीनुसार, मनमीत अरोराने पलकची भैय्यू महाराजांशी भेट घालून दिली होती. त्यानंतर विनायक, देशमुख आणि पलक या तिघांनी महाराजांना ब्लॅकमेल सुरू केले. त्यामुळेच महाराजांनी आत्महत्या केली असल्याचे बोले जात आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जर पोलिसांनी मला मदत केली असती तर…”, श्रद्धा वालकरच्या वडिलांचा गंभीर आरोप

Aprna

 नायर रुग्णालयात रूग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांसह सुरक्षारक्षकांना केली मारहाण

News Desk

उल्हासनगरमध्ये दोन गटातील हाणामारी सीसीटिव्हीत कैद

News Desk