HW News Marathi
क्राइम

‘ती’ सर्व शस्त्रे क्रॉफर्ड मार्केटमधून आणल्याची भाजप पदाधिकाऱ्याची कबुली

डोंबिवली | कल्याण गुन्हे शाखेकडून भाजपचे डोंबिवली शहराचे उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी (४९ वर्षे) यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. आता कुलकर्णी यांच्या दुकानात एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा कसा ? कशासाठी ?, असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. याची पोलिसांकडून चौकशी सुरु होती. दरम्यान, आता ‘ही शस्त्रे आपण क्रॉफर्ड मार्केटमधून आणल्याची कबुली धनंजय कुलकर्णी यांनी पोलिसांना दिली आहे.

डोंबिवलीत धनंजय कुलकर्णी यांचे तपस्या फॅशन हाऊस नावाचे दुकान आहे. त्या दुकानातून कल्याण गुन्हे शाखेकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरु असताना धनंजय कुलकर्णी यांनी आपण ही शस्त्रे क्रॉफर्ड मार्केटमधून आणल्याचे धक्कादायक विधान केले आहे. कुलकर्णी यांच्या दुकानातून पोलिसांनी तब्बल १८० प्रकारची शस्त्रे जप्त केल्याची माहिती मिळत आ

या प्रकरणानंतर सोशल मीडियावर भाजपला लक्ष्य करण्यात आले. आनंदी आनंद गडे, शस्त्रेच शस्त्रे चोहीकडे, असा टोला सोशल मीडियावरून भाजपला लगावण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, या हत्यारांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या का, असा सवालही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितीन गडकरींना दाऊदच्या नावाने जिवे मारण्याची धमकी; कार्यालय आणि निवावसस्थानी सुरक्षेत वाढ

Aprna

3 लाख चोरी करणारे आरोपी अटक

News Desk

मुंबईत एकाच महिन्याच्या आत शौचालयाच्या वादातून दोन जणांचा बळी 

swarit