HW News Marathi
क्राइम

नितीन गडकरींना दाऊदच्या नावाने जिवे मारण्याची धमकी; कार्यालय आणि निवावसस्थानी सुरक्षेत वाढ

मुंबई | केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या नावाने जिवे मारण्याची धमकी आल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे राजकारणता एकच खळबळ माजली आहे. गडकरींच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात आज (14 जानेवारी) तीन वेळा फोन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात आज सकाळी 11.30 वाजताच्या सुमारासदोन कॉल आले होते. यानंतर तिसरा कॉल हा 12 वाजून 32 मिनिटाने आला होता. गडकरींना आला कॉल त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ताबडतोप वरिष्ठ पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. या प्रकाराची माहिती मिळातच पोलिसांचा ताफा चौकशीसाठी दाखल झाली. या कॉलमध्ये खंडणी दिली नाही तर गडकरींना जिवानिशी मारू, अशी धमकी दिल्याची माहिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली.

तसेच गरडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात आलेल्या कॉलबद्दल तपास सुरू पोलिसांनी सुरू केल्याची माहिती सूंत्रांकडून मिळाली आहे. या पारर्श्वभूमीवर गरकरींच्या निवासस्थानी आणि कार्यालयाच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आलेली आहे.

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल परब यांचे म्हणणे ऐकू- उच्च न्यायालय

News Desk

मोक्ष प्राप्तीसाठी ११ जणांची आत्महत्या

News Desk

तरुणीचे शौचालयातील क्लिप व्हायरल करणारा अटकेत

News Desk