HW News Marathi
क्राइम

ICICI बँक घोटाळ्याप्रकरणी चंदा आणि दिपक कोचर यांना जामीन मंजूर

मुंबई | कोचर दाम्पत्याला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. आयसीआयसीआय बँक घोटाळ्याप्रकरणी (ICICI Bank Scam Case) आयसीआयासीआय बँकेचे माजी एमडी चंदा कोचर (Chanda Kochhar) आणि माजी सीईओ (CEO) दिपक कोचर (Deepak Kochhar) यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात कोचर दाम्पत्यानी दाखल केलेल्या याचिकेवर आज (9 जानेवारी) सुनावणी पार पडली. यात कोचर दाम्पत्यांना जामीन मंजूर झाला असून कोचर दाम्पत्यांना मुंबई उच्च न्यायालयाने  1 लाख जातमुचलक्यावर सुटका मिळणार आहे.

व्हिडिओकॉन कंपनीचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांन बेकायदेशीररित्या कर्ज दिल्याप्रकरणी कोचर दाम्पत्यांना सीबीआयने 24 डिसेंबरला अटक केले होते यानंतर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयात कोचर दाम्पत्यासंह वेणूगोपाल धूत यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर कोचर दाम्पत्यांनी सीबीआयने केलेली कारवाई आणि अटक ही बेकायदेशीर असल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात चंदा कोचर यांच्या बाजूने वरिष्ठ अधिवक्ता अमित देसाई यांची बाजू मांडली तर त्यांचे पतीच्या वतीने ज्येष्ठ अधिवक्ता विक्रम चौधीर यांच्या बाजू मांडली. न्यायालयात न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पी. के. चव्हाण यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी पार पडली.

दरम्यान, कोचर दाम्पत्यांनी व्हिडिओकॉन कंपनीचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांना 2009 साली आयसीआयसी बँकेच्या सीईओ झाल्यानंतर चंदा कोचर यांनी बेकायदेशीरित्या वेणुगोपाल धूत यांच्या कंपनीला कर्ज मंजूर केले होते. चंदा कोचर यांनी 3250 कोटीचे कर्ज मंजूर केले होते. तसेच चंदा कोचर यांनी 2009 ते 2011 दरम्यान, 1875 कोटी रुपयांचे एकूण सहा कर्ज देण्यात आले होती. चंदा कोचर यांनी वेणुगोपाल धूत यांना कर्ज देताना सर्व नियम धाब्यावर बसविल्याचा आरोप सीबीआयने केला होता. व्हिडिओकॉनला कर्ज देण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आलेली होती. व्हिडिओकॉनला कर्ज देण्यासाठी चंदा कोचर यांनी सीईओ पदाचा गैरवापर केल्याचे सीबीआयने एफआयआरमध्ये म्हटले होते.

आयसीआयसीआय बँक घोटाळा असा उघडकीस आला

आयसीआयसीआय बँकेतील घोटाळा 2016 मध्ये बाहेर येण्यास सुरुवात झाली होती. आयसीआयसीआय बँक आणि व्हिडिओकॉनमध्ये अरविंद गुप्ता हे गुंतवणूकदार होते. अरविंद गुप्ता यांनी व्हिडिओकॉनला कर्ज देताना चंदा कोचर यांनी नियमाबाह्य कर्ज दिल्याचे लक्षात आणून दिले. कोचर यांनी व्हिडिओकॉनला 2012मध्ये दिलेल्या कर्ज मंजूर केले होते. या कर्जाच्या मोबदल्यात कंपनी न्यूपॉवर रिन्युएबल्स कंपनीसोबत डील केली होती. या कंपनीचे मालक हे चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर हेते. हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर अरविंद गुप्ता यांनी चौकशीसाठी आरबीआय आणि महत्व्याच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिले होती.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदेड पोलीसांनी प्रतिज्ञा घेऊन दहशदवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा केला

News Desk

व्हीआयपी नवी आय पी मोबाईल नंबर च्या नावाखाली लोकांची फसवणूक करणा-या रँकेटचा पर्दाफाश

News Desk

“… व्हायरल होतात ते मी कसे थांबवू”, उर्फी जावेदचा पोलिसांनाच उलट सवाल

Aprna