HW News Marathi
क्राइम

बंटी बबली फरार

उत्तम बाबळे

भोकर येथे कुडगुलवार पारिवार विशाल प्रतिष्ठान सुरू करून बीसी आणि अल्पबचत गटच्या नावाखाली अनेकांची फसवणूक करून पसार झाले याप्रकरणी भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कष्टाच्या घामाचे पै पै जमा करणा-या गरीब,मजूर,महिलांचे संसार उघड्यावर पडले असून व्यापा-यांनाही याचा मोठा फटका बसला आहे.तुर्तास ६१ जणांनी ३९ लाख रुपयास गंडविल्याची तक्रार दिल्यावरुन भोकर पोलीसांनी कुंडगुलवार पती पत्नी विरुद्ध फसवणूक व अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.माै.दिवशी ता.भोकर येथील मुळ रहिवासी असलेल्या विशाल विजयकुमार कुंडगुलवार (सावकार)यांनी काही वर्षापुर्वी नवा मोंढा भोकर येथील व्यापार पेठेत बस्तान मांडले.तसेच ममता ट्रान्सपोर्ट,विशाल ट्रेडिंग कंपनी व विशाल इंटरप्रायझेस,नवा मोंढा भोकर या नावाने एकाच छताखाली तीन ते चार प्रतिष्ठाण सुरु केले.धान्य खरेदी व हैद्राबाद – भोकर डेली सर्व्हीस ट्रान्सपोर्टींगचा व्यवसाय करत कुंडगुलवार यांनी प्रथम मजूर,हमाल,मापाडी,महिला ,शेतकरी व व्यापारी यांच्यात विश्वास संपादन केला.अनेकांचा विश्वास संपादन झाल्याची खात्री झाल्यानंतर त्याने हिला,मजूर,हमाल,मापाडी,शेतकरी,भाजीपाला विक्रेते,शेतकरी व व्यापारी यांना अल्पबचतीतून मोठ्या व्याज रक्कमेतून जमा रक्कमेच्या कितीतरी अधिक पटीने जास्त रक्कम मुद्दतीनंतर देण्यात येईल असे अमिष दाखविले. बीसी,आर.डी,एफ.डी,होम अप्लायन्सेस द्वारे महागड्या वस्तू देणे,आदीचा व्यवसाय थाटला.त्याच्या या मायाजालात अनेकजण पडले.तसेच हप्तेवारीवर भोकर शहरालगत प्लाॅट देण्यात येतील म्हणून प्लाॅट खरेदी ईच्छूक सभासदांनाही त्याने जाळ्यात ओढले. दि.८ एप्रिल २०१६ ते जून २०१७ पर्यंत या माध्यमातून विशाल कुंडगुलवार यांच्याकडे जवळपास २०० ते ३०० नागरिकांनी आपले लाखो रुपये जमा केले. गेल्या काही दिवसापुर्वी विशाल इंटरप्रायझेस या फर्मला टाळे लावल्याचे पैसे जमा करण्यासाठी व उचलण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरीकांनी ५ ते ६ दिवस विशाल कुंडगुलवार व त्याची पत्नी श्रुतिका विशाल कुंडगुलवार यांचा शोध घेतला असता त्यांचा कुठेही थांग पत्ता लागला नाही.ते फरार झाल्याचे लोकांना लक्षात आले. आपली फसवणूक झाली असा संशय आल्याने विशाल इंटरप्रायझेस समोर या नागरीकांनी एकच गोंधळ घातला.काहींनी ते दुकान पेटविण्याची तर काहींनी स्वत:लाच पेटऊन घेण्याचा प्रयत्न केला.यानंतर त्या सर्वांनी पोलीस ठाणे गाठले व फसवणूक झाल्याची तक्रार दिली.त्यात म.आवेसम.अलताफ भोजाणी यांचे १३,००,०००/-, अंजनाबाई देवराव सुर्यवंशी यांचे ३,३१, ७००/-, सचिन कमटलवार यांचे १,४१,७००/-,संतोष मामीडवार यांचे ४,९३,०००/-, कमलाबाई रेड्डी यांचे १,५०,०००/-, भिमराव गुंडेवार यांचे १,२५,०००/-,योगेश राजकंठवार यांचे १,००,०००/-,भाऊराव सुर्यवंशी यांचे ८७,०००/-,मारोती उल्लेवाड यांचे ६७,२००/-,दिपक जाधव यांचे ८६,०००/- ,लक्ष्मीबाई गोरखनाथ मस्के यांचे ३२,०००/-,गंगूबाई बाबूराव नामेवाड यांचे ३०,०००/-,यासह आदींनी रुपये जमा केलो होतोत म्हणना-या अशा एकूण ६१ जणांचा त्यात समावेश असून या सर्वांचे ३९ लाख ४१ हजार ७३० रुपये घेऊन कुंडगुलवार दांपत्याने पलायन केले असल्याची उपरोक्त सर्वांच्या वतीने अंजनाबाई देवराव सुर्यवंशी,रा.म.फुले नगर ,भोकर यांनी दि.२८ जून २०१७ रोजी भोकर पोलीसात फिर्याद दिल्यावरुन २९ जून २०१७ रोजी विशाल कुंडगुलवार व त्याची पत्नी श्रुतिका विशाल कंडगुलवार यांनी संगनमताने अमिष,प्रलोभणे दाखवून फसवणूक व अपहार केल्याचा या दांपत्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय वाळके,पो.नि.संदिपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.सुरेश भाले,पो.उप.नि.सुशिलकुमार चव्हाण हे करत आहेत.या भुलभूलैयाला बळी पडलेल्या गरीबांचे संसार उघड्यावर पडलेत तर चतूर समजल्या जाणा-या व्यापा-यांनाही मोठा झटका बसला आहे.तपासाअंती ३ ते ४ कोटी रुपयास अनेकांना गंडविल्याचे समोर येणार असून अनेकांना गंडऊन कुंडगुलवार दांपत्य चफुचक्कर झाल्याने ” बंटी और बबली ” चित्रपटाची पुनरावर्ती झाल्याची चर्चा अनेक जण करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

News Desk

पोलिस अधिका-यांचा गौरव करणे पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम – सहाय्यक पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत 

News Desk

धारावीत फायरिंग एकजण ठार

News Desk