HW News Marathi
क्राइम

दिशा सालियन प्रकरणी सीबीआयने दिले स्पष्टीकरण

मुंबई | दिशा सालियन प्रकरणी (Disha Salian case) सीबीआयने मोठा खुलासा केला आहे. सीबीआयकडकून दिशा सालियन प्रकरणी अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. दिशा सालीयन प्रकरण सीबीआयने (CBI) कधीही हाताळले नाही असे स्पष्टीकरण दिलेले आहे. हे प्रकरण सीबीआयकडे कधीही सोपवण्यात आलेले नव्हते. त्यामुळे दिशा सालियन प्रकरणात सीबीआयने कुठलाही तपास केला नाही.

दरम्यान, दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा निष्कर्ष अश्या नावाने फिरणाऱ्या बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचेही यात म्हटले आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे. दिशा सालियन प्रकरणावरून हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घातला आहे.

हिवाळी अधिवेशनात भाजपचे आमदार नितेश राणेंनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे नव्हता, असा दावा केला होते. तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दिशाच्या मृत्यू प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे नव्हतो, तो तपास मुंबई पोलिसांकडे होता, असा खुलासा ही सभागृहात केला होता. नितेश राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर CBI ने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

दिशा सालियन प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करणार

“अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूची चौकशी मुंबई पोलीस करत आहे. या विषयासंबंधी कोणाकडे अधिक पुरावे असल्यास सादर करावे. या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) करण्यात येईल”, अशी घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी 22 डिसेंबर रोजी विधानसभेत केली.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोध असताना मुलीचे लग्न लावले, सहा महिन्यांनी केला जावयचा खून

News Desk

धक्कादायक! बीडच्या तरुणानं तुरुंगात बसून ५ देशातल्या लोकांना घातला कोट्यावधींचा गंडा

News Desk

बॅगेत मृतदेह टाकून मुलगी, जावाई फरार

News Desk