HW News Marathi
क्राइम

मुख्य न्यायाधीशांना दहशतवाद्यांची धमकी

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांना फोनवरून धमकी देण्यात आली आहे. या धमकीचा फोन दहशतवादविरोधी पथकाला आला होता. यानंतर न्यायालय परिसरातील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. धमकीनंतरन्यायालय परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. चेल्लूर यांच्या दालनाबाहेर श्वानपथक तैनात करण्यात आले आहे. न्यायालयाच्या परिसराची कसून तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीत आतापर्यंत काहीही आक्षेपार्ह आढळून आलेले नाही, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी न्यायालयाने बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना शिक्षा सुनावली होती. त्यामुळे ही धमकी देण्यात आल्याचा अंदाज असून त्यानुसार पोलिस तपास करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाशिम जिल्हा कृषी विकास अधिकारी धापाते लाच घेतना रंगे हात अटक

News Desk

सांगली साधू मारहाण प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना घेतले ताब्यात

Aprna

नागपूर-चंद्रपूर महामार्गावर जनावरांची तस्करी करणाऱ्या गाडीने पोलिसाला चिरडले

News Desk