HW News Marathi
क्राइम

जालन्यामध्ये कुंटणखान्यावर कारवाई; ७ महिलांसह ३ जण अटक

जालना शहरातील मोदीखाना भागात एका कुंटणखाण्यावर केलेल्या कारवाईत पोलिसांनी ७ महिलांसह तीन जणांना ताब्यात घेतले आहे. मोदीखाना भागात एका घराच्या दुसऱ्या मजल्यावर हा व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईत ३७ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दामिनी पथकाच्या सहायक पोलिस निरीक्षक नालंदा लांडगे यांच्या फिर्यादीवरून बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कांदिवलीत अल्पवयीन मुलीची आत्महत्या

News Desk

भोकर तालुक्यातील एका आदिवासी मुलीची मध्यप्रदेशात विक्री

News Desk

सात वर्षे ‘लिव्ह इन’मध्ये राहिल्यानंतर प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा

News Desk
देश / विदेश

रामजन्म भुमी वगळता कुठेही मशीद बांधता येईल- सुब्रमण्यम स्वामी

News Desk

भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. रामजन्मभुमी वगळता कुठेही मशिद बांधता येईल अस वक्तव्य स्वामी यांनी केलय. सौदी अरेबियामध्ये मशिदी तोडण्यात आल्यानंतर त्या मशिदींची जागा बदलण्यात आली होती. त्याच धर्तीवर भारतात देखील बाबरी मशिद मुस्लीम बहुल भागात हलवण्यात येऊ शकते असं स्वामी यांनी सुचवल्यामुळे नवी वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहे. भारतातील तब्बल २४००० मंदीर प्राचीन काळात तोडण्यात आली होती. आम्ही यापैकी फक्त मथुरेचं कृष्ण मंदीर, अयोध्येचं राम मंदीर आणि वाराणसीचं काशी विश्वनाथ या मंदिरांच्या उभारणीसंदर्भातच बोलत असल्याचही त्यांनी म्हटलय.

बाबरी मशिद प्रकरण हे सध्या सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत आहे. या प्रकरणात कोर्टाबाहेरच सेटलमेंट करण्याचा पर्याय देखील सुप्रीम कोर्टानं सुचवला होता.

Related posts

सेनेचे संपर्क प्रमुख राहिलेल्या अरविंद सावंत यांच्यावर अवजड उद्योगाची जबाबदारी

News Desk

साताऱ्याचे रणजित मोरे यांची मेघालय उच्च न्यायालयात बदली..

Arati More

दिल्ली हिंसाचारवर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली

swarit