HW News Marathi
क्राइम

Online Loan App च्या माध्यमातून अवाजवी वसूली करणार्‍या आंतरराष्ट्रीय टोळीचा सायबर गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

मुंबई | मुंबई शहर तसेच संपूर्ण देशात Instant Loan App च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. ग्राहकांना प्रत्यक्ष Call करुन तसेच SMS द्वारे सोशल मिडीयाच्या माध्यमाने On Line Link पाठवून व मोबाईल Play Store च्या माध्यमातून Loan App डाऊनलोड करण्यास सांगून त्याद्वारे तात्काळ व सोप्या पध्दतीने Online लोन उपलब्ध करून देतात.

सदर लोन अॅप हे गरीब व गरजू लोकांना त्यांची आत्यंतिक मेरेज तात्काळ मोबाईलवर घरबसल्या अॅपच्या माध्यमातून साधारणतः ५ ते १० हजार इतक्या रक्कमेचे कर्ज देत असल्याने अशा लोन अॅपव्दारे कर्ज मिळविण्याचे प्रमाण फार मोठे आहे. सदर लोन अॅपव्दारे मिळणाऱ्या लोनचा व्याजदर अवाजवी असून असे अॅप डाऊनलोड करताच ते डाऊनलोड करणाऱ्यास पिडीताने अॅप इंन्स्टॉल करताना दिलेल्या परवानगीच्या आधारे पर्सनल कॉन्टॅक्ट डिटेल्स व गॅलरी सोबत माईक, कॅमेरा, मेसेज यांचा अॅक्सेस हा त्या लोन अॅप कंपनीकडे जातो. तसेच लोन अॅपवर सादर केलेला सेल्फी, पॅन व आधार कार्ड असा महत्वाचा डाटा हा संबंधीत कंपनीकडे संकलित केला जातो. त्या डाटाच्या आधारे लोनची रिकव्हरी देण्यास उशीर करणाऱ्या, टाळाटाळ करणाऱ्या ग्राहकांना, त्यांचे नातेवाईकांना धमकी व अश्लील मजकुराचे मेसेज पाठविले जातात. रिकव्हरी न देणाऱ्या ग्राहकास तसेच त्याने रिकव्हरी दिली असली तरी लोन अॅप कंपनी अधिक वसुलीच्या हव्यासापोटी त्याने दिलेल्या फोटो गॅलरीच्या अॅक्सेसमुळे सदर गॅलरीतील फोटो मॉर्फ करुन व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून ग्राहकाच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील सर्व लोकांना प्रसारित केले जातात. तसेच लोन न घेता केवळ लोन अॅप डाऊन करणाऱ्या ग्राहकांची देखील अशाच प्रकारे छळवणूक केली जाते.

या प्रकरणी पश्चिम प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्याने फिर्यादी यांच्या सविस्तर जबाबावरून गुन्हा नोंद केला. त्यामध्ये फिर्यादीने त्याच्या आईच्या वैद्यकीय उपचाराकरीता व वैयक्तिक गरजांकरीता अशा प्रकारचे एकूण १० लोन ॲपद्वारे एकुण रु. ३,८५,०००/- इतक्या रक्कमेचे लोन घेतले होते. सदर लोनच्या परताव्यापोटी त्याने आज पावेतो रु.२२,००,०००/- इतकी रक्कम लोन कंपन्यांना त्यांनी दिलेल्या धमक्या, मॉर्फ केलेले अश्लिल फोटो व्हायरल होऊन बदनामीच्या भितीने दिली आहे. तरी देखील या कंपन्यांचा हव्यास पूर्ण न झाल्याने त्यांचे धमकाविणे सुरुच होते. या त्रासाला कंटाळुन फिर्यादी यांनी पोलिसांत तक्रार दिली. सदर गुन्ह्याच्या तपासात प्राप्त तपशीलाचे तांत्रिक विश्लेषण करुन नमूद गुन्हयात एकूण १४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अटक आरोपीताचे सखोल चौकशी दरम्यान तो लोन रिकव्हरीसाठी कॉलर म्हणून काम करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे चौकशीत नमूद गुन्हयातील पुढच्या फळीच्या आरोपीतांची माहिती प्राप्त झाली. हे आरोपी आपसातील कम्युनिकेशन करीता डिंगटॉक या अॅपचा तर ग्राहकांशी संपर्क करण्यासाठी क्लीक टु चॅट, एन एक्स क्लाऊडचा वापर करीत होते. हे सर्व आरोपी एक ग्रुप अथवा टोळी म्हणून कार्यरत होते. ज्यामध्ये प्रत्येकाचा स्वतंत्र रोल होता. ज्यात लोन परताव्याची मुदत संपण्यापुर्वी कॉल करणारे, मुदत संपल्यावर कॉल करणारे तसेच लोन परत न करणाऱ्या ग्राहकास धमकाविण्याचे काम करणारे, त्यापुढे ग्राहकास व त्याचे कॉन्टॅक्ट लिस्टमधील व्यक्तींना अश्लील मेसेज व मॉर्फ फोटो पाठविणारे यांचा समावेश होता. या सर्वांवर लक्ष देण्याकरीता टिमलिडरची नेमणूक असून त्यावर मॅनेजर व कंपनी डायरेक्टर असतात.

याद्वारे मुंबई पोलीस सर्वसामान्य जनतेस आवाहन करीत आहेत की,
१) नागरिकांनी आर्थिक निकडी पोटी इस्टंट लोन अॅप ऐवजी अधिकृत बँकांचा आधार घ्यावा.
२) अनोळखी मोबाईल क्रंमाक वरून SMS लिंकद्वारे उपलब्ध लोन अॅप, मोबाईलमध्ये डाऊनलोड करु नये.
३) डाऊनलोड केलेल्या अॅपला इंन्स्टॉल करताना आपल्या मोबाईल मधील गॅलरी व कॉन्टॅक्ट सोबत कॅमेरा, माईक, मेसेज यांच्या अॅक्सेसची परवानगी देऊ नये.
४) कृपया बँक खाती उघडण्यासाठी तुमची कागदपत्रे इतर व्यक्तींस देऊन नयेत, कोणासही तुमचे सिमकार्ड वापरण्याची परवानगी देऊ नये. दुसरा वापरत असलेल्या आपल्या गोष्टी बेकायदेशीर कारणांसाठी वापरल्या जाऊ शकतात.
५) कृपया लोन रिकव्हरी एजन्टच्या अपमानास्पद व अत्याचारी पध्दतीला शरण जाऊ नका अशा प्रसंगी स्थानिक पोलिसांकडे तात्काळ तक्रार नोंदवा.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पतीने पत्नीला चालत्या रेल्वेखाली ढकलून दिले

News Desk

ठाकरे गटातील सुषमा अंधारे यांच्यासह ‘या’ पाच नेत्यांवर चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Aprna

उंदीर मारण्याचे औषध घेऊन तरूणाची आत्महत्या

News Desk