HW News Marathi
क्राइम

येवला-मनमाड मार्गावर भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू

येवला | येवला-मनमाड मार्गावर इर्टिगा आणि आयशर या दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात एका कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात येवला-मनमाड मार्गावरील अनकाई बारीजवळ पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यात इर्टिंगा कारचा अक्षरश: चुराडा झाला.

या कारमधील जेसीबीच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आली. मृत्युमुखी पडलेले सर्व जण नगर आणि कोपरगाव येथील रहिवासी होते. मृतांमध्ये ३ महिला, २ पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. आयशर गाडी मनमाडच्या दिशेने जात होती, तर इर्टिगा कार ही येवल्याच्या दिशेने जात प्रवास करत होती. यादरम्यान, दोन्ही गाड्या येवला-मनमाड मार्गावर समोरासमोर धडकल्या आणि भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणी जालन्यातून आणखी एक जण ताब्यात

News Desk

पोलिस अधिका-यांचा गौरव करणे पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम – सहाय्यक पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत 

News Desk

कुत्र्यांनी तोडले महिलेच्या मृतदेहाचे लचके

News Desk
राजकारण

केरळमधील काँग्रेसचे खासदार एम.आई. शानवास यांचे निधन

News Desk

तिरुअनंतपूरम | केरळमधील काँग्रेसचे खासदार एम. आई. शानवास (६७) यांचे निधन झाले आहे.चेन्नईतल्या के डॉ. रॉय इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वायनाड या मतदारसंघातून ते काँग्रेसचे खासदार होते. २ नोव्हेंबरला त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली असून, त्याच्या एक दिवसापूर्वीच त्यांना छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संसर्गामुळे ते गंभीररीत्या आजारी होते. शानवास यांना गुरुवारी (२२ नोव्हेंबर)ला सकाळा १० वजाता एर्नाकुलम थॉटमच्या दफनभूमीत दफन करण्यात येणार आहे.

शानवास यांचा जन्म २२ सप्टेंबर १९५१ रोजी प्रसिद्ध वकील इब्राहिम कुट्टी आणि नूरजहाँ बेगम यांच्या घरी झाला. शानवास यांचे राजकीय कारकीर्द १९७८मध्ये सुरू झाली. त्यांनी १९७८मध्ये युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष, १९८३मध्ये केपीसीसी संयुक्त सचिव आणि १९८५मध्ये केपीसीसीचे उपाध्यक्ष म्हणून काम केले. १९८७मध्ये वडाक्केकर मतदारसंघातून निवडणूक लढले, १९९१मधून पट्टांबीच्या विधानसभा निवडणूक आणि १९९९मध्ये पिरवाय्या लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढले. २००९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला असून, २०१४मध्ये ते पुन्हा खासदार झाले.

 

Related posts

महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिवपदी ट्रान्सजेंडर व्यक्तीची निवड

Arati More

२०१९मध्ये मोदींनाच पंतप्रधान म्हणून पसंती

News Desk

शोपियान येथील चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk