HW News Marathi
क्राइम

…म्हणून त्याने आपल्याच वडिलांना जीवंत जाळले

वेल्लोर | वडिलाने ‘विश्वासम’ सिनेमा पाहण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने स्वत:च्या वडिलांना जीवंत पेटवल्याची ह्रदय पिळवटून टाकणारी घटना गुरुवारी (१० जानेवारी) सकाळी घडली आहे. ही घटना तामिळनाडू येथील वेल्लोरमधील घडली असून मुलगा अजिथ कुमार याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी करत आहेत.

नेमके काय आहे प्रकरण

दक्षिण सिनेसृष्टीतील फेमस ‘विश्वासम’ हा सिनेमा काल (१० जानेवारी) प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची सर्व दक्षिणसिनेसृष्टीत चांगलीच चर्चा रंगली आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी अजिथ कुमार याचे ४५ वर्षीय वडील पांडियन यांना पैसे मागितले होते. पांडियन हे वेल्लोरमध्ये रोजंदारीवर काम करतात. पत्नीशी भांडण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते घराबाहेर रस्त्याच्या कडेला राहत होते. गुरुवारी (१० जानेवारी) सकाळी पांडियन येथील एका बंद दुकानासमोर झोपले होते.

त्यावेळी अजिथ कुमारने त्यांना उठवले आणि यासाठी मला पैसे द्या. मात्र, पांडियन यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे रागाने अजिथ कुमार याने घरातून रॉकेलची बाटली आणली. त्यानंतर पांडियन यांच्या अंगावर रॉकेल ओतले आणि आग लावून पळ काढला. पांडियन आगीमुळे मोठमोठ्याने ओरडू लागले. त्यावेळी आजूबाजूला असलेल्या मजुरांनी त्यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर मजुरांनी पांडियन यांना वेल्लोरमधील सरकारी रुग्णालयात दाखल असून सध्या पांडियन यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फेक TRP प्रकरणी Republic Tvच्या दोन अधिकाऱ्यांना समन्स ! अडचणींत वाढ…

News Desk

पालकमंत्री राम शिंदेंच्या सुरक्षारक्षकाने केला तरूणीवर लैंगीक अत्याचार

News Desk

मॉडेलच्या हत्येचे गुढ उलघडले

News Desk