HW Marathi
महाराष्ट्र

९२ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ग्रंथ दिंडीने सुरुवात

यवतमाळ | ९२ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ग्रंथ दिंडीने आज (११ जानेवारी) सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्‍ते संमेलनाचे उद्घाटन होणार होते. परंतु त्यांना निमंत्रित करण्यात आल्याने काही संघटनांनी त्यांना विरोध दर्शवला. यानंतर संमेलनाच्या उद्घाटकाचा मान राजूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नी वैशाली सुधारक येडे यांना मिळाला आहे. संमेलनाच्या आयोजकांनी उद्घाटक म्हणून शेतकरी महिलेला मान देण्याची विनंती महामंडळाला केली होती. तर संमेलनाध्यक्षपदी डॉ. अरणा ढेरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

ग्रंथदिंडीमध्ये संत दर्शन देखावे, जन्मशताब्दी वर्ष असणारे पु.ल. देशपांडे, ग.दि. माडगूळकर यांच्या जीवन दर्शनावरील देखावे, लेंगीनृत्य, गोंडीनृत्य, कोलामीनृत्य अशा विविध लोक संस्कृतींचे दर्शन घडले. ग्रंथदिंडीत मावळते संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, स्वागताध्यक्ष मदन येरावार, कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांची उपस्‍थिती होती.

ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्‍ते करण्यात आले झाले. आझाद मैदान येथून निघालेली ग्रंथदिंडी पाच कंदील चौक, तहसील चौक, गोधनी रोड, राजन्ना बिल्डींग, अणे महिला महाविद्यालय, दत्त चौक, बस स्थानक चौक, गार्डन रोड, एल.आय.सी. चौक, पोस्टल ग्राऊंड या मार्गाने संमेलनस्थळी पोहचवण्यात आली.

नयनतारा सहगल यांच्या भाषणाच्या २००० प्रतींचे वाटप होणार

प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार नसल्या तरी त्यांच्या विचारांचा जागर होणार आहे. नयनतारा यांच्या भाषणातील मुद्दे परखड असल्याने त्यांचे आमंत्रण रद्द करण्यात आले.  सहगल यांच्या भाषणाच्या २००० प्रतींचे उद्घाटन स्थळी वाटप करण्यात येणार आहे. यासाठी काही तरुणांनी पुढाकार घेतला आहे.

 

Related posts

उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार | मुख्यमंत्री

News Desk

जलनायक निवडीसाठी 24 एप्रिलपर्यंत अर्ज करा

News Desk

नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा.. शिवसेना तोंडघशी पडल्याची टीका

News Desk