HW News Marathi
क्राइम

लुटमार करणाऱ्या पाच जणांना अटक

विनोद तायडे, वाशिम

वाशिम – केनवड ते डोणगाव रस्त्यावर 29 जुलै रोजी सोने व्यापार्‍याला गंभीर जखमी करून दागिन्यांच्या लुटमार केल्याप्रकरणी पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अवघ्या एका महिन्यात पाच चोरट्यांना जेरबंद केले. आरोपींनी गुहेमध्ये लपविलेला 290 ग्रॅम सोने, 4 किलो 367 ग्रॅम चांदी असा एकूण 7लाख 65 हजार रुपयाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. रोशन म्हस्के, शुभम वंजारी, दीपक नवले (रा. डोणगाव) तसेच विशाल पांडव व निखिल मोरे अशी आरोपींची नावे आहेत. त्यापैकी दीपक नवले हा फिर्यादी व्यापारी विश्वेश सराफ यांच्या दुकानात नोकर होता. व या आरोपीनेच पूर्ण चोरीचे प्लॉनिंग केल्याचा अंदाज आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीसांनी आरोपींचे स्केच बनवून त्याच्या एक हजार प्रती वाटल्या होत्या. तसेच ही चोरीची घटना काही प्रत्यक्षदर्शींनी पाहिली असल्यामुळे पोलीसांनी गावागावात बॅनर लावून आरोपींची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच या प्रकरणी शिरपूर पोलीसांना पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांचे वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शन व त्यांनी केलेल्या सुचना पोलीसांनी तंतोतंत अंमलात आणल्यामुळेच कोणताही सुगावा मागे न ठेवलेल्या व पोलीस विभागाला आव्हान ठरलेल्या या चोरी प्रकरणाचा एका महिन्यातच छडा लावून पोलीसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बच्चू कडू यांना न्यायालयाचा दणका; ‘या’ प्रकरणी शिक्षा आणि जामीन

Aprna

भाजपा नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा

News Desk

मुलापाठोपाठ पित्याचीही आत्महत्या

News Desk