HW News Marathi
क्राइम

पाच तोतया युवकांना पोलीसांनी केली अटक

ठाणे | अँटी करप्शन डिपार्टमेंटचे अधिकारी असल्याचे सांगत कॉमर्स क्लास मध्ये जाऊन शिक्षकाला मारहाण करणाऱ्या पाच तोतया युवकांना नौपाडा पोलीसांनी केली सोमवर २८ मे रोजी अटक केली आहे. ब्रम्हांड ठाणे येथे राहणारे ओल्वीन झेवीअर पी .परवेज नावाचे शिक्षक पेट्रोल पंप येथील आरामबाग बिल्डिंग मधिल एक्सेल नावाचा क्लासेस मध्ये शिकवत होते. त्यावेळी पाच इसम यांनी क्लास मध्ये शिरून त्यांना आपण अँटी करप्शन मधुन आल्याचे सांगत मारहाण केली. त्याचबरोबर खाली आपले वरीष्ठ उभे असल्याचे सांगून खाली नेण्या साठी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. महिन्यापूर्वी ही घटना घडली होती , या प्रकरणाची तक्रार ओल्वीन यांनी नौपाडा पोलीस स्टेशन मध्ये केली होती.

सदर प्रकरणाची गंभीर दखल परिमंडळ एकचे उपायुक्त डॉ .स्वामी यांनी घेतली. त्या प्रमाणे मारहाण करून गेलेले हे अनोळखी इसम कोण आहेत याचा तपास सुरु होता. सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाच्या आधारे खाली फोन वर बोलत उभ्या असणाऱ्या वाहतुक नगर अंधेरी येथे रहाणा-या मोहीत मदन वर्मा या तरुणाकडे याचा शोध घेउन त्याच्या कडे विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सोबत गुन्ह्यात सहभाग असणारे इतर चार आरोपी 1) मनोजकुमार मदन मोहन 2) मयुर शेखर राणे 3) मिथिलेश कुशेसर मुखीया 4) सूरज चांद पवार यांची माहिती दिली. मदन वर्माने दिलेल्या माहीतीच्या आधारे या युवकांचा शोध घेण्यात आला.

यावेळी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पोलीसांना सांगितले, ओल्वीन याचे एका महिलेबरोबर पाच वर्षांपासून प्रेम संबंध होते. दोन वर्षापूर्वी महिले बरोबर त्याचे संबंध संपुष्टात आले होते. गेल्या वर्षापासुन मयुर राणे बरोबर तिचे प्रेम संबंध जुळले होते. ओल्वीन याचे बऱ्याच महिलांबरोबर संबंध असल्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी आपण असे केल्याचे आरोपींनी कबूल केले .परंतु आरोपी आपल्या सोबत फोरव्हीलर एक्स्सयुव्ही गाडी घेउन आले होते व ओल्व्हीन याला जबरदस्ती खाली आणण्याचा प्रयत्न करत होते या वरून त्यांचा अजून काही उद्देश असण्याची शक्यता ग्रुहीत धरून त्याप्रमाणे चौकशी सुरु असल्याचे उपायुक्त डॉ .स्वामी यांनी सांगितले .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जळगाव जिल्हाधिका-याला आयएसआयएसकडून धमकीचे पत्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, राष्ट्रपती भवन उडवून देण्याची धमकी

News Desk

मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोघांना अटक

News Desk

औरंगाबादच्या तरूणांना आयसीसमध्ये जाण्यापासून परावृत्त करण्यात पोलिसांनी यश

News Desk