HW News Marathi
क्राइम

प्रिती बारिया हत्या प्रकरणीतील दोन्ही आरोपींना फाशी

भंडारा | भंडारातील बहुचर्चित प्रिती बारिया हत्या प्रकरणातील दोषीं आमीर शेख आणि सचिन राऊत या दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा भंडारा जिल्हा न्यायालयाने सुनावली आहे. एसी दुरुस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करुन दोघांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात प्रिती बारिया यांचा मृत्यू झाला असून यात त्यांचा मुलगा भव्य गंभीर जखमी झाला होता.

  • काय आहे प्रकरण

३० जुलै २०१५ साली रात्री आठच्या सुमारास तकिया वॉर्डातील रुपेश बारिया यांच्या घरीही एसी दुरुस्तीच्या बाहाण्याने आरोपींनी घरात प्रवेश करुन प्रिती बारिया यांची हत्या केली. दोन्ही आरोपींनी प्रिती बारिया (३०) यांच्या डोक्यावर हातोडीने वार करून त्यांची निर्घृणपणे हत्या केली. यावेळी प्रिती यांचा मुलगा भव्य बारिया (९) यांच्या डोक्यावर देखील हातोडीने वार केला. या हल्ल्यात भव्य गंभीर जखमी झाला. बारिया यांच्या घरातून सोने-चांदीचे दागिने आणि ३ लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम चोरी करुन फरार झाले.

भंडारा पोलिसांनी यांनी या दोन्ही आरोपींना एटीएममधून पैसे काढताना त्यांना पोलिसांनी पकडले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी आमीर शेख आणि सचिन राऊत यांच्यावर कलम ३०२, ३०७, ३९७ आणि ४५२ अंतर्गत गुन्हा नोंदवून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी जप्त केलेल्या हातोडीच्या आधारे आमीर शेख आणि सचिन राऊत या दोन्ही आरोपींना दोषी ठरविण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चेष्टा जीवावर बेतली, रागात कु-हाडीने एकाची हत्या

News Desk

निलम गोऱ्हें यांना जिवे मारण्याची धमकी : आरोपी अटक

News Desk

वीस लाख रुपये किमतीची कातडी जप्त

News Desk