HW News Marathi
क्राइम

अनिल देशमुखांना झटका! CBI न्यायालयाने पुन्हा एकदा जामीन अर्ज फेटाळला

मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पुन्हा एकदा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. देशमुखांचा विशेष सीबीआय न्यायालयाने आज (11 जुलै) पार पडलेल्या सुनावणीत त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे देशमुखांचा तुरुंगातील मुक्काम वाढणार आहे.

देशमुखांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 173 अन्वये आरोपाखाली अटक करण्यात आली होती. देशमुखांना अटक केल्यापासून 60 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करावे लागले. परंतु, जर 60 दिवसांच्या आत आरोप पत्र दाखल झाले नाही. तर आरोपींना डिफॉल्ट जामीन मिळण्याची शक्यता असते. पण, मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केलेल्या आरोपाखाली सीबीआयने गेल्याच महिन्यात आरोप पत्र दाखल केले होते.

नेमके काय आहे प्रकरण

देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाच्या बाहेर स्फोटकाने भरलेली कार सापडल्याने एकच खळबळ उडाली. स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं ठेवली होती त्या कारचा मालक मनसुख हिरेन याच्या हत्येमागे पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा हात असल्याचे समोर आली होती. या घटनेनंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. यानंतर देशमुखांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना १०० कोटीची वसुली केल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. या संपूर्ण प्रकरणाचा तपास ईडी करत असून या प्रकरणी ईडीने देशमुखांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. देशमुखांनी ईडीची अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय याचिका दाखल केली होती. परंतु, न्यायालयाने देशमुखांची याचिका फेटाळून लावली. यानंतर देशमुख हे ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. आणि ईडीने चौकशी केल्यानंतर देशमुखांना अटक केली.

संबंधित बातम्या
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या छातीत दुखू लागल्याने KEM रुग्णालयात दाखल
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मेहतांचे माजी सचिव सचिन पवारला हत्येप्रकरणी अटक

News Desk

“हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं, भाजपासहित सर्वांची…”, उदयनराजे

News Desk

मंत्री अनिल परब यांना ईडीचे दुसरे समन्स, परब यांनी किरीट सोमय्यांवर दाखल केला 100 कोटींचा मानहानी दावा

News Desk