HW News Marathi
क्राइम

भावाचे हातपाय बांधून अल्पवयीनेवर सामूहिक बलात्कार

अमरावती – जंगलात औषधी आणण्यासाठी गेले असताना भावाचे हातपाय बांधून त्यांच्यादेखत 13 वर्षीय बहिणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री घडली. चांदुर रेल्वे तालुक्यातील परसोडा जंगलात रविवारी घडलेल्या या घटनेप्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी पसार झाले आहेत. सुगाव्यासाठी श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली आहे.

पीडित भाऊ-बहिण परसोडा परिसरात राहतात. शेतमालकाने सांगितलेली जडीबुटी आणण्यास पीडित मुलगी आणि चुलत भावासह जंगलात गेली होती. या वेळी त्यांच्या मागावर आलेल्या दोन अज्ञातांनी चाकूच्या धाकावर बालिकेच्या भावाचे हातपाय बांधून त्याला मारहाण केली. त्यानंतर दोघा नराधम भावासमोरच तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांची आज न्यायालयीन कोठडी संपणार; काय निर्णय येणार, याकडे सर्वांचे लक्ष

Aprna

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

Aprna

वाहतूक पोलिसाला मारहाण

News Desk