HW News Marathi
क्राइम

दिल्लीत ४० कोटीचे हिरोइन जप्त, पोलिसांनी २ आरोपींना अटक

नवी दिल्ली | दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने आज १० किलो हिरोईन हा आम्ली पदार्थ जप्त केला आहे. या हिरोईनची किंमत जवळपास ४० कोटीपर्यंत असल्याची सांगितली जाते. पोलिसांनी या कारवाईत दोन आरोपींना अटक केले आहे. तसेच हे हिरोईन कुठून आणले होते आणि ते कुठे घेऊन जाणार होते. दिल्ली पोलीस यांचा तपास करत आहे.

तसेच फेब्रुवारी महिन्यात देखील दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई करत २.५ किलो अफगाण हिरोईन जप्त केले होते. या प्रकरणात पोलिसांनी दिल्लीच्या द्वारका येथील सेक्टर १९ मधून तिघांना अटक केले होते. तसेच मार्च महिन्यात देखील महसूल गुप्तचर संचालनालय विभागाने (डीआरआय) यांनी दक्षिण दिल्लीमधील सरोजिनी नगरमधून २८.८७ किलो हिरोईन जप्त केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अकोला भरधाव ट्रकच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

News Desk

पार्टीत NCP नेत्याच्या जवळचा माणूस, देवेंद्र फडणवीस यांचा मोठा खुलासा

News Desk

वाशिम येथे दलित महिलेची हत्या

News Desk