HW News Marathi
क्राइम

मुंबईत दररोज तीन महिलांवर बलात्कार; पोलिसांच्या अहवालातून मोठा खुलासा

मुंबई | महिलांसाठी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मायानगरी मुंबईत दररोज सरासरी 3 महिलांवर बलात्कार (Women Rape Case) होत आहेत. यावर्षी जानेवारी ते जूनपर्यंत महिलांवरील बलात्काराचे ४९४ गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) जारी केलेल्या मासिक गुन्हे अहवालात ही बाब समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या अहवालानुसार, गेल्या महिन्यात म्हणजेच जून महिन्यात महिलांवर बलात्काराच्या ७३ घटना नोंदवण्यात आल्या आहेत. मे महिन्यात हा आकडा 95 होता, ज्यामध्ये किरकोळ प्रकरणे 52 आणि मोठी प्रकरणे 43 आहेत.

जूनमध्ये दररोज २ महिलांवर बलात्कार झाले, तर मे महिन्यात दररोज 3 महिलांवर बलात्कार झाले. जून आणि मे महिन्यात म्हणजे गेल्या 61 दिवसांत 168 महिलांवर बलात्कार झाला, अशाप्रकारे या काळात मुंबईत सरासरी 3 महिलांवर बलात्कार झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. या वर्षी जानेवारी ते जूनपर्यंत म्हणजेच गेल्या 183 दिवसांत महिलांवरील बलात्काराचे 494 गुन्हे दाखल झाले आहेत. दररोज सरासरी 2 ते 3 महिलांनी पोलिस ठाण्यात कोणावर तरी बलात्काराच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. त्याच वेळी, 2021 मध्ये जानेवारी ते जून या कालावधीत बलात्काराचे 475 गुन्हे दाखल झाले आहेत.

८४% प्रकरणे निकाली काढली 

बलात्काराच्या घटनांमध्ये तपासाचे प्रमाण पाहता काहीसा दिलासा मिळतो. जानेवारी ते जून या कालावधीत नोंदवलेल्या महिलांवरील बलात्काराच्या 84 टक्के गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केल्याचे अहवालात म्हटले आहे. हे यश 2021 च्या तुलनेत 19 टक्क्यांनी जास्त आहे, कारण गेल्या वर्षी पोलिसांनी केवळ 78 टक्के प्रकरणांची उकल केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुदखेडमध्ये पकडली गांजाची झाडे

News Desk

इज्तेमात सहभागी झालेला कर्मचारी निलंबित

swarit

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेर आत्महत्येचा प्रयत्न

News Desk