उत्तम बाबळे
नांदेड :- पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी स्थापलेल्या विशेष पोलीस पथकाने पथक स्थापन झाल्याच्या दुस-या महिन्यातील पहिली धाडसी कारवाई किनवट शहरात केली असून या छाप्यात १,२१,०१० रुपयाची अवैध विक्रीसाठी नेत असलेली विदेशी दारु,एक आरोपी व दोन चार चाकी वाहने असा १६ लाख २१ हजार ०१० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विशेष पोलीस पथकास ३ जुलै २०१७ रोजी गुप्त माहिती मिळाली की नांदेड शहरातील राजेंद्र नगर मध्ये राहत असलेल्या अजय जयस्वाल यांच्या घरासमोरील सिमेंट रस्त्यावर एक निळ्या रंगाची मारुती स्विफ्ट डिझायर कार क्र.एम.एच.२२ व्ही.१८८८ ही उभी असून त्या कारमध्ये अवैध विक्रीसाठी नेत असलेली विदेशी दारु आहे.यावरुन दुपारी पथक प्रमुख सहाय्यक पो.नि.ओमकांत चिंचोलकर व त्याचे सहकारी पोलीस कर्मचारी,लाठकर,जगताप,वानखेडे,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.